Skip to main content

Posts

Showing posts with the label ललित

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

बाप

"बाप"   #स्फुटलेखन जीवनात आपल्याला "बाप असणं" हा नशिबाचा भाग आहे. आपण कोणाचं "बाप असणं" हे देखील भाग्य आहे. एखाद्या क्षेत्रात "बाप असणं" आणि कोणाच्या तरी मनात "बाप असणं" हे मात्र कर्तुत्वावर अवलंबून आहे. "बाप माणूस आहेस तू" असा कोणी म्हणतं ना! तेव्हा आपल्या अंगात एक उत्साह संचारतो. आतून एकदम भारी वाटतं. "बाबा एक प्रॉब्लेम झालायं" हे सांगताना कितीही मोठी समस्या असली तरी काहीतरी मार्ग निघेल ही शाश्वती असते. बाप हा शब्द कधी काही लोकांना अव्यवहारी, असंस्कृत वाटतो..वडील, बाबा, आप्पा किंवा मग डॅडी आणि पप्पा हे सगळे शब्दप्रयोग वाचायला, ऐकायला नक्कीच चांगले वाटतात. परंतु बाप म्हटलं की नात्याची उंची हिमालयाचं शिखर गाठते. जसं रस्त्यावरील भांडणात मनातला सगळा राग आणि भावना फक्त भड ×× ह्या एका शब्दात समोरच्या पर्यंत पोचतात अगदी तसं. तुम्ही कधी एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंध्याला मिठी मारली तर तुम्ही तुमच्या बापाला मिठी मारल्याचा भास होतो. एवढा आवका असतो त्या बुंध्यात संपूर्ण झाडाला भक्कमपणे धरून ठेवण्याचा. बाप हा पाण्यातल्या म...

चौरंग

  चौरंग वयोमानानुसार आणि विविध अनुभवांनी जीवन आपल्याला बरेच काय काय शिकवते.. कधी कधी आपणच अनावधाने केलेल्या चुका लक्षात येत नाहीत. पण निसर्गनियमाप्रमाणे परत आपल्याच बाबतीत असं घडल्यानंतर कुठेतरी आपण पण असं कधी वागलो होतं का असं वाटतं आणि आठवतात काही प्रसंग. आपण एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये फॅमिली बरोबर छान डिनर करत बसलेलो असतो. आपण वर्ष दोन वर्षांपूर्वी अश्याच ओळखीच्या एका माणसाचा अडलेले काम करून दिलेलं असतं. तेव्हा तो माणूस चार वेळा आपल्याला भेटून एखादी भेटवस्तू देऊन थँक्यू म्हणून आपल्याशी नम्रतेने वागत असतो. नेमका आज हॉटेलमध्ये तोच माणूस, ती व्यक्ती त्याच्या मित्रांबरोबर बसलेली असते. आपली नजरानजर होते. आपण त्याला हात करतो. तोही आपल्याला छान हात करतो. क्षणभर आपल्याला वाटतं की तो आता आपल्या इथे येईल, आपल्याशी काय म्हणताय म्हणून दोन शब्द नक्की बोलेल. आपण आपल्या घरच्यांशी जुजबी ओळख करून देऊ वगैरे. पण तो मात्र आपल्याला हात करून नंतर मित्रांच्या गप्पांमध्ये रंगलेला दिसतो. हा तोच आहे ना नक्की असा आपल्याला चार वेळा प्रश्न पडतो. दोन वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगांमध्ये अजून अडकलेली असते प्...

माझी भटकंती - सीतामाई दरा

  सीतामाई दरा पुणेकरांची वीकएंड टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधली गोल्डन ट्रँगल ही ठरलेली ट्रीप. आता तुम्ही म्हणाल गोल्डन ट्रँगल म्हणजे तर अहो सिंहगड-पानशेत-खडकवासला. हा पुण्याचा हक्काचा गोल्डन ट्रँगल. एक गड-एक धरण-एक बॅकवॉटर्स तलाव असा त्रिकोणी मिलाफ असलेला गोल्डन ट्रँगल. सध्या सगळीकडे "जरा हटके" स्टाईलला महत्त्व आलं आहे. प्रत्येक क्षेत्रात किंवा एखाद्या गोष्टीत, प्रवासात जरा वेगळी वाट चालून पाहू असं प्रत्येकालाच वाटतं. अर्थात हया वेगळ्या वाटेने गेलं की कधी काही हरवतं तर कधी नवीन काहीतरी सापडतं. नेहमीचे गुलमोहोर आणि बोगनवेलांनी भरलेले रस्ते सोडून वेगळ्या अवघड वाटेवर मग एखादा लाल रंगाचा चाफा दिसतो तर कधी रानटी पिवळी फुले दिसतात. एखादं डेरेदार झाड हिरवं भरलेलं असतं. आपल्याला त्यांची नावे माहिती नसतात पण छान वाटतं असा निसर्ग अनुभवायला. ह्या गोल्डन ट्रँगल च्या प्रवासात सिंहगडच्या पायथ्याशी जरा डाव्या बाजूला वाकडी वाट केली की आपण डोणजे गावात पोहोचतो. तसं पाहायला गेलं तर हे छोटं खेडं आहे. सिंहगडच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं. गेल्या काही वर्षात मात्र पुण्यातल्या लोकांचं फार्महाऊसचं...

Adv OR Skip Ad ->>

  Adv OR Skip Ad ->> दररोज सकाळी दारात पडणारं वर्तमानपत्र आणि ठरलेला तक्रार वजा संवाद "हल्ली ना, पेपरात जाहिरातीच जास्त आणि बातम्या कमी." संध्याकाळी ठरलेल्या वेळेत लागोपाठ चार सिरीयल बघणाऱ्या बायकासुद्धा जाहिराती आल्या की एक प्रकारे चिडतात. "काय बाई अर्धा तासाची सीरीअल आणि जाहीरातीच निम्म्यावेळ..मग चालणारच ह्या वर्ष वर्ष भर." एवढं सगळं असलं तरी आपण नियमितपणे वर्तमानपत्र घेत असतो, रोज पुन्हा नव्याने सीरीअल बघणं चालूच असतं. वर्षभराच्या सवलतीवर मिळते म्हणून अजूनपण एखादे वर्तमानपत्र आपण लावतो आणि लागोपाठ चार चार सिरीयल बघत असतो. मग हया जाहिरातींचं एवढा वाईट का वाटतं? जाहिरात म्हटलं की मला मी आठवतं ते म्हणजे लहानपणी पेपर वाचायला लागलो की आई-बाबा ओरडायचे "काय रे! काय बघतोयस? त्या सिनेमा नाटकाच्या जाहिराती बघू नको सारख्या." त्याकाळीसुद्धा ठराविक पानांवर पानभर नाटक सिनेमाच्या भरगच्च जाहिराती असत. त्यात आपण किशोर वयात कोणत्या बघायचो हे तुम्हाला नक्की आठवत असणार. आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे जाहिरात. कदाचित आपण आपली बरीचशी मतं हया जाहिरातींवर ...

#चिंधी #स्फुटलेखन

# चिंधी चिंधीला जी आपुलकी असते,ती बॅंडेड पट्टीला असूच शकत नाही.  चिंधीला मायेची उब असते, तर बॅंडेड पट्टीला औषधांचा दर्प. ही उब, ही माया "ती"च्या हाताची असते. लहानपणी आई, किशोर वयात बहीणाबाई, तरुणपणी प्रेयसी तर पुढे झालेली सहचारिणी आणि उतारवयात  मुलगी.  आयुष्यात मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्ट-परिवार कधी बरोबर असतात तर कधी नसतात.  कटु अनुभव, तर दुःखद प्रसंगी माणसाला खरी गरज असते ती कोणीतरी चिंधी बांधायची.  साधारणत: भेटतात ते सगळेच बॅंडेड पट्टी लावणारे असतात. अश्या वेळी अनुभव आणि सहकार्याची हळद लावून आधाराची चिंधी बांधाणारं कोणी असलं कि दु:ख हलकं तर होतंच आणि पुढे जाऊन त्या कटूतेची तीव्रता राहात नाही. जखम बरी होईपर्यंत चिंधी चिकटून राहते, बॅंडेड पट्टी सारखी रोज बदलावी लागत नाही. एकदा का बरं झालं की ती आपण फेकून देतो.  जखम बोच ठेवून जाते पण चिंधीचा स्पर्श लाभला तर व्रण राहात नाहीत. तिन्ही जगाचा स्वामी, नारायणाला सुध्दा भुतलावर येऊन चिंधीची माया अनुभवायची इच्छा झाली. म्हणून तर ते काव्य आहे "चिंधी बांधते द्रौपदी, हरीच्या (श्रीकृष्ण) बोटाला.." - मिलिंद सहस्रबु...

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...

Remote... तरीही जवळचा

  Remote... तरीही जवळचा त्या दशकांमध्ये "जिच्या हाती पाळण्याची दोरी.." तसं घरा-घरात "ज्याच्या हाती रिमोटचं बटण तो.." असं समीकरण होतं. रात्री साडे आठची वेळ:  आमची आई घाईघाईत हॉलमध्ये आली. तिच्या ठरलेल्या सिरीयलचं टाइमिंग झाले होते. रिमोट कुठेय म्हणून शोधत होती. बाबा सोफ्यावर पेपर वाचत बसले होते. त्यांच्याकडे बघून म्हणाली (नेहमीच्या चिडक्या स्वरात, कारण मनात हेच की ह्यांनीच बातम्या बघून कुठे तरी इकडे तिकडे ठेवला असणार.)  "अहो  बघितलाय का,  कुठे आहे remote" बाबा पण सॉलिड, पटकन म्हणाले " सध्या शरद पवार साहेबांकडे आहे". आम्ही सगळे जोरजोरात हसलो. आईला पण हसू आवरले नाही, जरी तिला रिमोट अजून सापडला नव्हता तरी.  तसाही सध्या महाराष्ट्राचा रिमोट "बारामतीच्या गोविंदबागेतच" आहे. त्याच्याआधी "नागपूरच्या रेशीमबागेत" होता. मात्र सुरुवात झाली ती कलानगर "मातोश्रीच्या परस बागेतून".  खरंच, रिमोट ही अशी वस्तू आहे की जेव्हा ती हातात येते ना तेव्हा आपण जणू काही काळा पुरते अनिभिक्त सम्राट असल्यासारखं वाटतं. बदाम सात खेळताना शेवटची सत्ती आपल...

सुचणं

 # सुचणं सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही... काही सुचतच नाही सध्या? "खूप दिवस झाले, तुझा एखादा लेख article आलं नाही Facebook वर". असं कोणी म्हटलं ना की मनात येतं "काय सांगू?" खूप विचार, खूप विषय मनात येतात आणि चमकून जातात. तेवढ्यापुरतं काहीतरी सुचतं परंतु नंतर पुढे मात्र वाढत नाही. एखादा विषय सुचणं किंवा खरं सांगू का? बसलोय आणि सुचतं असं काहीच नसतं. जसं घरातले दिवे गेलेत, आपण अंधारात मेणबत्ती लावून बसलोय. अचानक पापणी लवताक्षणी पटकन दिवे येतात. ज्या खोलीत बसलोय तिथली ट्यूब पटकन पेटते. तसंच होतं. कोणीतरी काहीतरी बोलत असतं, आपण काहीतरी ऐकत असतो, बघत असतो किंवा वाचत असतो. समोरची बोलणारी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि पटकन आपली ट्यूब पेटते. तोवर डोक्यातले दिवे गेलेलेच असतात. त्या खोलीतली ट्युब पेटली की आपण लगेच बाहेर बघतो. आजूबाजूचे दिवे मग एकामागोमाग पेटतात. अगदी तसंच होतं पहिली ट्यूब पेटते, डोक्यात विषय किंवा विचार क्लिक होतो. मग इतर दिवे जसे  पाठोपाठ लागतात तसं त्या विषयाच्या अनुषंगाने फटाफट...

सेन्सेक्स

  सेन्सेक्स विचारांचे Bull कधी Dominate करतात तर आचारांचे Bear सेन्सेक्स खाली पाडतात. हे वर खाली होण्यात जो जीवंतपणा आहे ना त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसाच्या ओठावर गुणगुणला जाणारा हा शब्द म्हणजे "सेन्सेक्स". रोजच्या दैनंदिन जीवनात तरुण वर्गापासून ते अगदी काठी टेकवत चालणार्या आजोबांपर्यंत एकदा तरी ज्याची आठवण काढतोच तो म्हणजे "सेन्सेक्स". "काय रे आज चढला का?" "का पडला?" ही दोन वाक्य प्रत्येकजण सध्या विचारतोच. तसं पाहिलं तर त्यावर काय रोजचे आयुष्य अवलंबून आहे तर अजिबात नाही. असं असून सुद्धा त्याचा एक चस्का लागला आहे सर्वांना. मार्केट, म्युचल फंड, फंड मॅनेजर, डिविडंट, कैडल चार्ट यांसारखे न कळणारे शब्द संग्रह सुद्धा सगळेजण सध्या लीलया वापरू लागले आहेत. साध्या भाजीवाल्या पासून ते मुकेश अंबानी पर्यंत सगळेच. अर्थात 1992 साला नंतर आलेल्या Globalisation निर्णयाचे हे स्वागतार्ह दूरगामी परिणाम आहेत. नकळतच आज सेन्सेक्स, तुमच्या आमच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊन बसला आहे. असा हा सेन्सेक्स त्याच्याबद्द...

टॉनिक

टॉनिक शैलाताई हॉलमध्ये निवांत बसल्या होत्या.  एकटक खिडकी कडे बघत.  तेवढ्यात बेल वाजली. "अगोबाई आता काय करावे, हया गुडघ्यांनी ऊत आणलाय मेला. काय मध्येच दुखायला लागतात"  थोड्या उठल्या आणि परत बसल्या. "नेहा.. जरा बघ, दार उघड. अमितच आला असेल वाजले साडेसात कारण." अमितने बूट काढतानाच पहिला प्रश्न जरा अधिकारनंच विचारल्यासारखा "आई! काय गं बरी आहेस ना? गेली नव्हतीस ना संध्याकाळी चक्कर मारायला आणि मग त्या तुमच्या कट्ट्यावर?"  "नाही रे बाबा नव्हते गेले कुठेही. विचार नेहाला हवंतर. ती तर पाचलाच आलीय आज." शैलाजाताईंची पुटपुट सुरु झाली "काय मेलं, मला गेले एक-दीड आठवडा घरी बसून ठेवला आहे. काय धाड भरलीय." असं म्हणत उठून कोचावर बसल्या आणि झी मराठी चालू केलं सिरीयलचा रतीब टाकायला. किचनमध्ये चहा घेताना नेहा म्हणाली "अमित, काय रे बघ ना दोन आठवडे झाले आईंची तब्येत काही सुधारत नाही. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे गोळ्या, औषध, सकाळचे स्पेसिफिक ब्रेकफास्ट घरगुती व्यायाम चालू आहे पण..." "हो ना अगं,  काय झालंय कळतच नाही पहिल्यासारखी फ्रेश...

स्टार्टअप

स्टार्टअप योगेश तावातावाने बोलत होता "बाबा,  तुम्हाला काय कळतंय स्टार्टअप म्हणजे काय ते! तुम्ही कायमच डीटीपी करून दहा ते पाच सरकारी कार्यालयात घासलीत. कधी वेगळा विचारच केला नाहीत. एलआयसी पीएफ आणि एफडी  यात तुटपुंज्या व्याजावर पैसे साठवत बसलात. शेअर्स, म्युच्युअल फंड काय माहिती तुम्हाला.  तुमचे प्रभाकर काका बघा. व्हीआरस घेऊन त्यांनी बिझनेस चालू केला आज दोन फ्लॅट आहेत त्यांचे शहरांमध्ये. स्वतःचं असं काहीतरी करायचं असतं असं कधी वाटलंच नाही तुम्हाला. आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजे काय कळणार तुम्हाला." हयांना जोरात ठसका लागला होता डोळ्यातून पाणी वाहत होते तरीही हे काहीतरी बोलतच होते त्याला. योगेश ताटावरुन उठून गेला होता. आणि आमचे हे नुसतंच वाढलेल्या पानाकडे बघत बसले होते. मला मात्र मेलीला काहीच कळत नव्हतं. काय स्टार्टअप , कसलं स्टार्टअप, कुठे आहे कंपनी, काय एवढे भारी करते की योगेश त्यावरून हयांना येवढं बोलतोय. ते फक्त एवढेच म्हणाले की  स्टार्टअप वगैरे फालतू गोष्टीत काही पडू नको त्या एका चांगल्या कंपनीचा जॉबचा कॉल आला आहे तर लगेच जॉईन कर. एवढं महाभारत घडल्यावर त्या रात्र...