"ये जो पब्लिक है ये सब जानती है ये जो पब्लिक है".. हे गाणं ऐकलं की मला नेहमी हिंदी पिक्चर अथवा कोणत्याही हिट फ्लॉप सिनेमाची आठवण येते. हॉलिवूडच्या स्टीवन स्पीलबर्ग पासून ते आत्तापर्यंतच्या नीरज पांडे पर्यंत कोणताही टॅलेंटेड अनुभवी आणि मुरलेला दिग्दर्शक असो, एखाद्या प्रथितयश निर्माता असो, अथवा सुपरस्टार असो, या पब्लिकचं मन असं काही ओळखू शकलेला नाही. जगाच्या पाठीवर बहुतेक असा कोणीही नसेल जो सिनेमा यायच्या आधी छातीठोकपणे सांगेल की हा पिक्चर सुपर डुपर हिट होईल. हां ! आता स्वतः स्वतःची फॅन फॉलोइंग फौज तयार करून तीन हजाराच्या वर स्क्रीनवर चित्रपट लावून शंभर-दोनशे करोडची लाल करणारे भाई लोक आहेत. पण ते काही सर्वसमावेशक हिट चित्रपटात गणले जात नाहीत, आणि अहो त्यांनाही ह्या पब्लिकनी "किक" मारलीच आहे की. तर, या पब्लिकची नस ओळखणे फारच कठीण. ज्या स्पीलबर्गच्या पहिला जुरासिक पार्क ला जगभर लोकांनी डोक्यावर घेतलं त्याचाच पुढचा जुरासिक ची काय अवस्था झाली ते सर्वश्रुत आहे. आपल्याकडे शोमन राजकपूर ला सुद्धा ज्या "संगम" बद्दल काहीच अपेक्षा नव्हती, तो पार पडदा फाडून सु...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही