Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

स्टार्टअप

स्टार्टअप योगेश तावातावाने बोलत होता "बाबा,  तुम्हाला काय कळतंय स्टार्टअप म्हणजे काय ते! तुम्ही कायमच डीटीपी करून दहा ते पाच सरकारी कार्यालयात घासलीत. कधी वेगळा विचारच केला नाहीत. एलआयसी पीएफ आणि एफडी  यात तुटपुंज्या व्याजावर पैसे साठवत बसलात. शेअर्स, म्युच्युअल फंड काय माहिती तुम्हाला.  तुमचे प्रभाकर काका बघा. व्हीआरस घेऊन त्यांनी बिझनेस चालू केला आज दोन फ्लॅट आहेत त्यांचे शहरांमध्ये. स्वतःचं असं काहीतरी करायचं असतं असं कधी वाटलंच नाही तुम्हाला. आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजे काय कळणार तुम्हाला." हयांना जोरात ठसका लागला होता डोळ्यातून पाणी वाहत होते तरीही हे काहीतरी बोलतच होते त्याला. योगेश ताटावरुन उठून गेला होता. आणि आमचे हे नुसतंच वाढलेल्या पानाकडे बघत बसले होते. मला मात्र मेलीला काहीच कळत नव्हतं. काय स्टार्टअप , कसलं स्टार्टअप, कुठे आहे कंपनी, काय एवढे भारी करते की योगेश त्यावरून हयांना येवढं बोलतोय. ते फक्त एवढेच म्हणाले की  स्टार्टअप वगैरे फालतू गोष्टीत काही पडू नको त्या एका चांगल्या कंपनीचा जॉबचा कॉल आला आहे तर लगेच जॉईन कर. एवढं महाभारत घडल्यावर त्या रात्र...