Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019
मित्र, मैत्री... मैतर सीन वन..ॲक्शन "ए मिल्या".."मिल्या$$".. सोसायटीच्या पार्किंगमधून कोणीतरी हाका मारत होतं. अचानक जाग आली आणि पाहतो घड्याळ्यात तर रात्रीचा एक वाजला होता. मी नेहमीप्रमाणे हॉलमध्येच टीव्ही पाहत झोपलो होतो आणि झोप कधी लागली कळलंच नाही. As usual टीव्ही चालूच होता. जरा दोन मिनिट वाटलं भास होतायत. पण परत "मिल्या$$"..अशी हाक ऐकू आली. हा तर संदीपचा आवाज वाटतोय. लक्षात आल्यावर पटकन दार उघडलं आणि खाली पार्किंग मध्ये बघितलं तर संदीपच हाका मारत होता.  "मिल्या लेका पटकन खाली ये. सुहासच्या वडिलांना मेजर अटेक आलाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलय." मी पण घाबरून "काय सांगतोस". आत आलो आईला उठवलं निरोप दिला.  जसा होतो तसं हाफ पॅंटवर जर्किन चढवलं आणि निघालो. रात्रीचे साधारण दीड वाजले असतील. मी आणि संदीप डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पाचव्या मजल्यावर.  काकांना आयसीयु मध्ये ठेवलेलं होतं. बाहेर सुहासची आई, भाऊ आणि इतर नातेवाईक होतेच. सुहासला भेटलो तर तो as usual स्टेबल होता. "कंडिशन थोडी critical आहे असं डॉक्टर म्हणतायत" एवढंच बोलला.  ब