Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

अनिल अवचट - मी आणि बाबा

  मी आणि बाबा खरंच असं जगता येईल का? हा एकमेव प्रश्न मनात घर करून राहिला. काल शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर दिलेला फोटो open केला. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे अजून दोन चार ग्रुप वर "शास्त्र असतं ते" नियमाप्रमाणे Forward देखील केला. इतका सोपं असू शकतं का जगणं? विचार करणं? असं सतत मनाला वाटत राहीलं. घरासमोरची काढलेली सुंदर रांगोळी, कौतुक करायला "अरे वा छान काढलीय" "आज 32 ठिपक्यांची का?" "रंग मस्त भरलेत" वगैरे म्हणणारं कोणीही नाही. परत कुणीतरी येणारा जाणारा चालतांना चुकून पुसून जाणार. तरीही कोणतीही चिडचिड, मनात खंत न बाळगता उद्या तशीच नवीन सुंदर रांगोळी काढायची. काय असेल ना! अनिल अवचट (बाबा), त्यांनी जे मुलाखतीत म्हटलंय ते आत्मसात करणं खूप अवघड आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात म्हणाल तर Impossible आहे. स्वतःच्या आई कडून शिकलेली "आनंदी राहण्याची" गोष्ट कदाचित त्यांच्या रक्तात कायमची भिनून गेली असावी. "एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद बाकी कोणी कौतुक केलं पाहिजे असं काही नाही" हे जीवनाचं मुल्य ठरवून बाबा कायम ज

Adv OR Skip Ad ->>

  Adv OR Skip Ad ->> दररोज सकाळी दारात पडणारं वर्तमानपत्र आणि ठरलेला तक्रार वजा संवाद "हल्ली ना, पेपरात जाहिरातीच जास्त आणि बातम्या कमी." संध्याकाळी ठरलेल्या वेळेत लागोपाठ चार सिरीयल बघणाऱ्या बायकासुद्धा जाहिराती आल्या की एक प्रकारे चिडतात. "काय बाई अर्धा तासाची सीरीअल आणि जाहीरातीच निम्म्यावेळ..मग चालणारच ह्या वर्ष वर्ष भर." एवढं सगळं असलं तरी आपण नियमितपणे वर्तमानपत्र घेत असतो, रोज पुन्हा नव्याने सीरीअल बघणं चालूच असतं. वर्षभराच्या सवलतीवर मिळते म्हणून अजूनपण एखादे वर्तमानपत्र आपण लावतो आणि लागोपाठ चार चार सिरीयल बघत असतो. मग हया जाहिरातींचं एवढा वाईट का वाटतं? जाहिरात म्हटलं की मला मी आठवतं ते म्हणजे लहानपणी पेपर वाचायला लागलो की आई-बाबा ओरडायचे "काय रे! काय बघतोयस? त्या सिनेमा नाटकाच्या जाहिराती बघू नको सारख्या." त्याकाळीसुद्धा ठराविक पानांवर पानभर नाटक सिनेमाच्या भरगच्च जाहिराती असत. त्यात आपण किशोर वयात कोणत्या बघायचो हे तुम्हाला नक्की आठवत असणार. आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे जाहिरात. कदाचित आपण आपली बरीचशी मतं हया जाहिरातींवर