पत्रास कारण की... आज पत्र लिहितोय. कदाचित शाळा-कॉलेज सोडल्यानंतर पत्र आणि पत्रलेखन विसरलो होतो. इंटरनेट ई-मेल Facebook, Facetime, व्हाट्सअप यांच्या भाऊगर्दीत एकमेकांशी बोलणं होतं पण संवाद होतोच असं नाही. मला अजूनही आठवतंय लहानपणी पोस्टकार्ड किंवा इनलैड लेटरची आपल्याकडे मामा मावशी आत्या यांची पत्र यायची. ती वाचली जायची नंतर कित्येक दिवस ती जपून ठेवलेली असायची. मग कधी जुन्या कपाटाच्या खाली जेव्हा केर काढले जायचे तेव्हा ती पत्र भसकन बाहेर यायची मागे मागे टाकलेली. आपल्या आवडीची पत्र मग परत परत वाचली जायची. आजी किंवा आई वाचायची. कधी चांगल्या-वाईट कटू प्रसंग आठवून रडायची मग तिला पाहून मलापण उगाच रडू यायचं. खरं सांगू का गंमत होती त्यात, नातं जपणं म्हणजे काय हे मला त्या पत्रांनी नकळत शिकवलं. हल्लीच्या व्हाट्सअप Clear चॅट सारखं नव्हे. मला नेहमीच महाराष्ट्र टाइम्सची टॅगलाईन "पत्र नव्हे मित्र" समर्पक वाटते. खरंच ते पत्र जिवाभावाचा मित्र होता जणू. त्याच्यापाशी दोन्ही बाजूंची माणसं अतिशय मोकळेपणाने व्यक्त होत होती आणि तो मित्र म्हणजे पत्र हा इतका बेमालूम पणे त्यां दोन बाजूंना, जीवांन
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही