नेतृत्व की विचारधारा..... 2019 चा निकाल 2014 पेक्षाही सर्वार्थाने मोठा ऐतिहासिक, धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा आहे. 201४ ची परिस्थिती वेगळी होती सलग दहा वर्ष एक पक्ष इतर पक्षांना घेऊन एकसुरी राज्य करत होता. राष्ट्रीय आणि प्रादेशिक दोन्ही पातळीवरील विविध पक्षांना बदल हवा होता. त्या बदलाच्या मानसिकतेचा परमोच्च बिंदू गाठला आणि नरेंद्र मोदी नामक एक नेतृत्व उदयास आले. जागतिक इतिहासात जेव्हा जेव्हा जनमानसात एक देशाच्या सरकार अथवा नेतृत्वाबद्दल एक विरोधाची भावना तीव्र होत जाते तेव्हा कधीतरी एक असा परमोच्च क्षण येतो आणि सरकार अथवा नेतृत्व इतक्या मोठ्या प्रमाणात पराभूत होते की त्याची इतिहासात नोंद होत जाते . त्याच मुळे 2014 हे लोकांनी मतपेटीतून उलथवलेले आणि ज्याचा फायदा एका नेतृत्वाने योग्य पद्धतीने घेतला असे हे सरकार होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर च्या इतिहासात मधील काही अपवाद वगळता एकाच पक्षाचे एकाच विचारधारेचे सरकार राज्य करीत होते अगदी २०१४ सालापर्यंत. दोन विविध विचारधारांचे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी लढत होते. आपण नेहमीच म्हणतो की विचारधारा ही जिंकून देते लोक विचारधा
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही