"बाहुबली" तसा मी सध्याच्या क्रिकेटचा चाहता नाही प्रत्येक मॅच बॉल टु बोल बघणारा अगदी इंडिया ची मैच असली तरी. सगळी रेकॉर्ड लक्षात ठेवणारा आणि चार मित्रमंडळी किंवा नातेवाईका समोर आपण जणू कसे हर्षा भोगले आहोत अशा अविर्भावात ती रेकॉर्ड फेकणारा. सचिन-राहुल-सौरव नंतर हळूहळू क्रिकेट बघणे कमी झालंय किंवा इंटरेस्ट कमी झाला म्हणा. आयपीएल सारख्या तद्दन मनोरंजनमय क्रिकेटमुळे तर जणू संपलाच आहे. संध्याकाळी घरी आल्यावर "Snacks आणि Cold Drinks" किंवा चहा-कॉफीचे स्मॉल लार्ज पेग पीत वर्षाला शेकडा मैचेस बघायची अशी आवडच राहिलेली नाही. तरीही सध्याच्या भारतीय क्रिकेट जगतात जी काही एका हाताच्याच बोटावर मोजावीत अशी नावं घ्यावी (किंवा नाव ठेवू नयेत) असे मला वाटणारे खेळाडू म्हणजे रोहित, बुमराह, राहणे, थोड्याफार प्रमाणात विराट आणि बाहुबली महेंद्रसिंग धोनी. खरंच भारतीय क्रिकेटमधला तो बाहुबलीच आहे. बाहुबली सिनेमा तो महेंद्र (प्रभास) जसा एका हातात कित्येक किलो वजनाची शंकराची पिंड लीलया उचलतो, अगदी तो फोटो तो शॉट मॉर्फ करूनच डोळ्यासमोर येतो तो...धोनीने भारतीय क्रिकेट संघाचा पिंड रुपी कैल...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही