टॉनिक शैलाताई हॉलमध्ये निवांत बसल्या होत्या. एकटक खिडकी कडे बघत. तेवढ्यात बेल वाजली. "अगोबाई आता काय करावे, हया गुडघ्यांनी ऊत आणलाय मेला. काय मध्येच दुखायला लागतात" थोड्या उठल्या आणि परत बसल्या. "नेहा.. जरा बघ, दार उघड. अमितच आला असेल वाजले साडेसात कारण." अमितने बूट काढतानाच पहिला प्रश्न जरा अधिकारनंच विचारल्यासारखा "आई! काय गं बरी आहेस ना? गेली नव्हतीस ना संध्याकाळी चक्कर मारायला आणि मग त्या तुमच्या कट्ट्यावर?" "नाही रे बाबा नव्हते गेले कुठेही. विचार नेहाला हवंतर. ती तर पाचलाच आलीय आज." शैलाजाताईंची पुटपुट सुरु झाली "काय मेलं, मला गेले एक-दीड आठवडा घरी बसून ठेवला आहे. काय धाड भरलीय." असं म्हणत उठून कोचावर बसल्या आणि झी मराठी चालू केलं सिरीयलचा रतीब टाकायला. किचनमध्ये चहा घेताना नेहा म्हणाली "अमित, काय रे बघ ना दोन आठवडे झाले आईंची तब्येत काही सुधारत नाही. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे गोळ्या, औषध, सकाळचे स्पेसिफिक ब्रेकफास्ट घरगुती व्यायाम चालू आहे पण..." "हो ना अगं, काय झालंय कळतच नाही पहिल्यासारखी फ्रेश
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही