Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

माझी भटकंती - सीतामाई दरा

  सीतामाई दरा पुणेकरांची वीकएंड टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधली गोल्डन ट्रँगल ही ठरलेली ट्रीप. आता तुम्ही म्हणाल गोल्डन ट्रँगल म्हणजे तर अहो सिंहगड-पानशेत-खडकवासला. हा पुण्याचा हक्काचा गोल्डन ट्रँगल. एक गड-एक धरण-एक बॅकवॉटर्स तलाव असा त्रिकोणी मिलाफ असलेला गोल्डन ट्रँगल. सध्या सगळीकडे "जरा हटके" स्टाईलला महत्त्व आलं आहे. प्रत्येक क्षेत्रात किंवा एखाद्या गोष्टीत, प्रवासात जरा वेगळी वाट चालून पाहू असं प्रत्येकालाच वाटतं. अर्थात हया वेगळ्या वाटेने गेलं की कधी काही हरवतं तर कधी नवीन काहीतरी सापडतं. नेहमीचे गुलमोहोर आणि बोगनवेलांनी भरलेले रस्ते सोडून वेगळ्या अवघड वाटेवर मग एखादा लाल रंगाचा चाफा दिसतो तर कधी रानटी पिवळी फुले दिसतात. एखादं डेरेदार झाड हिरवं भरलेलं असतं. आपल्याला त्यांची नावे माहिती नसतात पण छान वाटतं असा निसर्ग अनुभवायला. ह्या गोल्डन ट्रँगल च्या प्रवासात सिंहगडच्या पायथ्याशी जरा डाव्या बाजूला वाकडी वाट केली की आपण डोणजे गावात पोहोचतो. तसं पाहायला गेलं तर हे छोटं खेडं आहे. सिंहगडच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं. गेल्या काही वर्षात मात्र पुण्यातल्या लोकांचं फार्महाऊसचं