# कोरोनायोद्धा *करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे* भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत. "कृपया माझ्या विधानाचा विपर्यास करू नका" त्यांची ही कळकळीची विनंती ऐकून मनात चलबिचल झाली. आजकालच्या प्रसारमाध्यमां समोर बोलताना भले भले जण घाबरतात. काही थोर मंडळी तर प्रसारमाध्यमांसमोर येत सुद्धा नाहीत. आपल्या कडून चुकून बोलून गेलेल्या वाक्याची चुकीची ब्रेकिंग न्यूज होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांची जीभ चावली. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब अशी कळकळीची विनंती करताना, त्यांना नक्कीच काही वर्षांपूर्वीची आठवण मनात झाली असेल. हयाच देशाच्या प्रसार माध्यमांनी आपल्या एका साध्या,सरळ, कार्यक्षम गृहमंत्र्यांची विकेट घेतली होती. तीसुद्धा अशाच एका संकटकाळात. मागील वर्षीच्या एप्रिलपासून हा माणूस सदैव अविरतपणे कोरोना विरुद्ध उभा ठाकला आहे. क्षणाचीही उसंत न घेता तो महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची गेली १२ महिने अहोरात्र वाहून घेऊन सेवा करतोय. अतिशय कठीण प्रसंगांचा सामना करत अस
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही