Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020
पत्र प्रपंच.... उत्तरार्ध वडिलांचे मुलाला आलेलं पत्र सादर करतोय..                     ।।श्री गजानन।। बोरीवली, मुंबई             १७/०७/२०१९ प्रिय चिरंजीव..   बघ ना सुरुवात करतानाच आशीर्वाद चिरंजीव. मुलांच्या बाबतीत आई-वडिलांच्या विचारांची सुरुवातच अशी होते चिरायु चिरंजीव वगैरे. तुझे पत्र वाचतांना सतत आठवत होते ते 'आप्पा' माझे वडील, तुझे आजोबा. त्यांच्या पत्रांतपण असाच एक वैचारिक ओलावा असायचा. वाई सारख्या छोट्या गावातून मी मोठ्या शहरात आलो. शिक्षण पूर्ण केले, नोकरीला लागलो. परंतु या सर्व प्रवासात पत्र लिहिली ती फक्त ख्यालीखुशालीचीच. तीसुद्धा क्वचितच वर्षातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा खास माझ्या आईच्या प्रेमापोटी. आज तुझ्या पत्रामुळे बऱ्याच वर्षांनी तो योग परत जुळून आला. पेन हातात धरलं आणि मन पेनाच्या बॉलच्याटीप पासून ते रीफिलच्या शाई संपते तिथपर्यंत मागे गेलं.  विचार आला की इतकं काही आहे की शाई नक्कीच संपेल. अर्थात मी काही एवढे लिहिणार नाहीये काळजी करू नकोस. आता गेल्या काही वर्षात आमच्या बँकेत कॉम्प्युटर आल्यापासून तर लिहायची सवय पण मोडलेली आहे. ते कोर्टातले जज्ज जस