"ब्लॅक अँड व्हाईट" ८० च्या दशकात भारतात जेव्हा टेलिव्हिजन आले तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. तरी त्यांचं काय ते कौतुक होतं. तुम्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट बघत असलात तरी बघण्याची दृष्टी मात्र रंगीत होती. बातम्या देणारे निवेदक किंवा निवेदिका यांच्या कपड्यांचा रंग जरी दिसताना काळा पांढरा दिसत असला तरी बघणारे प्रेक्षकांच्या मनात मात्र ज्याचा त्याचा रंग असायचा. कोणाला तो लाल-पिवळा, जांभळा-निळा तर काळा दिसायचा. छायागीत बघताना वहिदाच्या मागे धावणारा देवानंद. त्याच्या हातभर शर्टावरचे चेक्स काळे पांढरे दिसले तरी देवानंद चाहत्यांना मात्र त्यात केशरी हिरवा तांबडा रंग दिसत होता. तर वहिदाच्या साडीवरची फुलं नारंगी आणि गुलबकक्षी रंगाची दिसायची. सांगण्याचे तात्पर्य असे की टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होते तरी बघणारे आपापल्या परीने त्यात रंग भरत होते आणि आनंद घेत होते. अशाच एका ब्लॅक टीव्हीचा २१व्या शतकात बघण्याचा योग परवा मुंबईमध्ये बीकेसीच्या मैदानावर पुन्हा आला. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंचावर एकत्र बसले होते. "एक पांढरी दाढी आणि एक काळी दाढी...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही