Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

हिमालयाची सावली

  हिमालयाची सावली आपण आतल्या खोलीत असतो आणि बाहेर TV वर एखादी मालिका किंवा सिनेमा चालू असतो. त्यातील काही संवाद आपल्याला आत ऐकू येतात. आपण आतूनच "अगं, विक्रम गोखले ना? बघ बरोबर ओळखलं की नाही!" अभिनया बरोबर आपल्या आवाजाचीही कडक ओळख असणाऱ्या मोजक्या अभिनेत्यां पैकी एक आवाज आज कायमचा हरपला. पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई आणि वडील चंद्रकांत गोखले अशी अभिनयाची हिमाच्छादीत शिखरे. ह्या सर्वांना सलाम करणारं ह्याच कुळातले अभिनय क्षेत्रातील हिमशिखर म्हणजे विक्रम गोखले. बॅरिस्टर नाटकामधील गाउन घातलेला, तोंडात सिगारेटचा पाइप आणि हातात पुस्तक घेऊन करारी खरज्यात संवाद म्हणत त्याचा तो विशिष्ठ पौज घेणारा वकील म्हणजे विक्रम गोखले. अमिताभ बच्चन समोर अग्निपथ मधील कमिशनर गायतोंडे आणि खुदागवाहमध्ये जेलर रणवीरसिंगच्या भूमिकेत तेवढ्याच ताकदीने अभिनय साकारणारा अधिकारी.. सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमात विघ्न आणणारा हम दिल दे चुके सनम मधील अस्खलित शास्त्रीय गायक पंडित दरबार म्हणजे विक्रम गोखले. लग्न संस्थेची मर्यादा ओलांडून ही आपला वाटणारा, कळत नकळत मधील मनोहर देसाई निवडणुकीच्या राजकारणात उभी-आडवी, ...

गुंतवणूक

  गुंतवणूक सध्याच्या घडीला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे गुंतवणूक. सीन वन... आमच्या सोसायटीतील शेजारच्या C विंगमधील साठे आजोबा रिटायर होऊन साधारण १२-१५ वर्ष झाली असतील. मोठ्या सहकारी क्षेत्रातील खात्यात बऱ्यापैकी मोठ्या पदावर होते. चांगले पेन्शन पदरात पाडून रिटायर झाले. दर महिन्याला पेन्शन बँकेत जमा होतं आणि मग साधारण पाच-सहा महिन्यांनी चांगली रक्कम अकाउंट वर जमा झाली की सुरू होते चलबिचल. आजोबांचं हे असं गुंतवणुकीचं विचार चक्र वर्षातून किमान दोनदा तीनदा तरी होतंच. एकाच बँकेत सगळे पैसे नकोत. म्हणून मग पेन्शनची सरकारी, व्याजदर काहीश्याच टक्क्यांनी जास्त म्हणून एक सहकारी. तर दैनंदिन व्यवहार Ease of Banking सोप्पे जावेत म्हणून एक प्रायव्हेट, अश्या किमान तीन बँका. एकाच खात्यावर नकोत, म्हणून पेन्शन व्यतिरिक्त एक सेव्हींग खातं. ही एवढी सगळी खाती संभाळता सांभाळता मन वेगळ्याच विचारांनी खातं ते वेगळंच. बँकेत काय सध्या व्याज मिळतंय? मग शेजारी राहणारा राहुल त्यांना सांगतो की आजोबा तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करा. कट्ट्यावरचे देशपांडे सारखे म्हणतात की सोन्यात गुंतवण...