आठवणींचा कप्पा दिवाळी - नरकचतुर्दशी पहिला दिवस वातावरणात थंडीची चाहूल लागली असायची आणि हलक्या धुक्यात एक वेगळाच गंध पसरवून दिवाळी यायची. "ह्या वर्षी रेनकोट कपाटात परत ठेवावे की नाही ह्याच विचारांच्या धुक्यात पुणेकर हरवून गेले आहेत." आई आणि आजी हमखास आधी उठून, अभ्यंगस्नान, देवपूजा करून गोडधोड करत असायची. आपण कितीही लवकर उठलो तरी हया तयारच दिसायच्या, जणू आदल्या रात्री पासूनच असल्यासारख्या. घराबाहेर पणत्या लावलेल्या असत. मोरी, शौचालय स्वच्छ धुउन त्यात पणत्या लावल्या जात. नरकासुराची नरकघाण स्वछ होउन सर्वत्र आरोग्य नांदो ही भावना. "ही लाल विटकरी मातीची, आनंदाची, प्रेमाची, चैतन्याची पणती अजुनही घरोघरी तेवते आहे." पहाटे आईच्या 'उठ रे आता' च्या हाकेने नाही तर धडाढधुढुम फटाक्यांनीच जाग यायची. लवकर पहाटे उठून पहिला फटका बौम्ब कोण फोडणार अशी चुरस असायची. मग काय पहाटे तीन साडेतीनला उठून पब्लिक एखादा सुतळी, लक्ष्मी फोडून परत झोपायचं. सकाळी एकमेकांकडे फराळ करत फिरतांना मीच कसा आधी तो फोडला ह्यावर चर्चा आणि धुव्वा. अगदी सुर्योदय पुर्वी वगैरे नाही पण पहाटे पाच-साडेपा
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही