"अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर कोणी ही कितीही मोठा नामवंत खेळाडू असो परंतु कप्तान पदाला जे सहिष्णुता आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे गुण लागतात ते त्याच्यात असतीलच असे नाही. परंतु ज्याच्याकडे ते असतात तोच कठीण परिस्थितीत यशस्वी होतो. हया कसोटीच्या निकालाचे तात्पर्य काय असेल तर हे आहे. आपल्या सध्याच्या भारतीय खेळाडूंना तंबूत परत जाणं पक्कं माहितीय पण खेळपट्टीवर तंबू ठोकून कसं राहयचं हे राहणेंच्या अजिंक्य ने दुसऱ्या मॅच मध्ये दाखवून दिलं. दुसरा द्रविड सापडला की काय असा भास व्हावा इतकं अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड यांच्यात साम्य जाणवलं. तीच ती किरकोळ शरीरयष्टी, चेहर्यावरचे शांत-संयमी, भावना अती प्रकट न करणारे भाव आणि तंत्रशुद्ध खेळ. जडेजाच्या पन्नाशीच्या घाईत चांगला सेट झालेला रहाणे आउट झाला. परंतु सहकाऱ्यांकडून एखादी चूक घडली तर त्या चुकीसाठी मैदानावर प्रतिक्रिया न देणे. पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्या सहकाऱ्याला त्या चुकीची लाज वाटू नये याची खबरदारी घेत त्याच्या खांद्यावर एक विश्वासाने हात ठेवणे आणि "चलता है रे" असं करून पुढे जाणे.
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही