"Present Value (PV) of चारमिनार" हैदराबादच्या पाण्यात आणि तिथल्या हवेत काही निराळी रसायन असावीत. ह्या हैदराबादनी आपल्या देशाला असे "पी व्ही" दिले की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक अमुलाग्र बदल घडून आणला. एक होते Father of Indian Economic Reforms म्हणजे "पी व्ही नरसिंहराव". पी व्ही नरसिंहराव हे १९९१ -९६ या पाच वर्षात भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. काँग्रेसच्या सर्वसाधारण परंपरेला छेद देत प्रथमच एक बिगर गांधी-नेहरू पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द उदयास आली. अर्थातच ती खणखणीत वाखाणण्याजोगी होती. १९९१ साली पीव्हींनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अर्थसंकल्प मांडला. ह्या अर्थसंकल्पाचे जनक होते डॉक्टर मनमोहन सिंग परंतु त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले ते पी व्ही नरसिंहराव. या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे GATT करार. ( General Agreement on Tariffs and Trade) भारताच्या वाटचालीत नवीन आर्थिक पर्व त्या क्षणी सुरू झाले. ज्याचे वर्णन खाजगीकरण किंवा जागतिकीकरण असे कायम करण्यात आले. परंतु ह्यास आपण उदारीकरण असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज सर्वज...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही