वाढदिवस अजूनही दरवर्षी मनात तोच लहानपणीचा वाढदिवस रुंजी घालतो. साधं होतं सगळं. कधी कधी होतं तर कधी नव्हतं. नवीन कपडे गोडधोड आणि थोडीफार मित्रमंडळी. पेन्सिल, पेन, तर कधी बिस्कीटचा पुडा अश्या गिफ्ट. अर्थात तो वाढदिवस लोकल (Local)असायचा. गेल्या १०-१५ वर्षात सोशल मीडियानी आपल्या सगळ्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने ग्लोबल (Global) केलाय. जपानच्या "टोकियो" पासून ते कॅलिफोर्नियाच्या "सॅन फ्रान्सिस्को" पर्यंत. तर ऑस्ट्रेलियाच्या "ब्रिस्बेन" पासून आर्यलंडच्या "डब्लिन" पर्यंत. शुभेच्छांचे वर्षाव आपल्याला लाभतात. कधी स्वतः आठवण ठेवून, तर कधी फेसबुक नी आठवण करून दिल्यावर. तर कधी आधीचे चार दिवस आठवण ठेवून. कित्येक मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि ओळखीची मंडळी जगभरातून आपल्याला आवर्जून शुभेच्छा देतात. happy birthday.फक्त दोनच शब्द. किती साधे सोप्पे सरळ पण काय ताकद असते ना ह्या शुभेच्छा मेसेजेसची. आनंद आणि खुशी मिळतें ती काही औरच. हो ना ! अमेरिकेतल्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या पदावर काम करणारा शाळेतला एखादा मित्र, जो कधी शाळेत असताना फक्त शिक्षक हजेरी घेता...
तुमच्या - माझ्या, मनातलं भावविश्व …..आणि बरंच काही