Skip to main content

Posts

करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे

 # कोरोनायोद्धा *करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे* भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.   "कृपया माझ्या विधानाचा विपर्यास करू नका" त्यांची ही कळकळीची विनंती ऐकून मनात चलबिचल झाली. आजकालच्या प्रसारमाध्यमां समोर बोलताना भले भले जण घाबरतात. काही थोर मंडळी तर प्रसारमाध्यमांसमोर येत सुद्धा नाहीत. आपल्या कडून चुकून बोलून गेलेल्या वाक्याची चुकीची ब्रेकिंग न्यूज होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांची जीभ चावली. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब अशी कळकळीची विनंती करताना, त्यांना नक्कीच काही वर्षांपूर्वीची आठवण मनात झाली असेल. हयाच देशाच्या प्रसार माध्यमांनी आपल्या एका साध्या,सरळ, कार्यक्षम गृहमंत्र्यांची विकेट घेतली होती. तीसुद्धा अशाच एका संकटकाळात.  मागील वर्षीच्या एप्रिलपासून हा माणूस सदैव अविरतपणे कोरोना विरुद्ध उभा ठाकला आहे. क्षणाचीही उसंत न घेता तो महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची गेली १२ महिने अहोरात्र वाहून घेऊन सेवा करतोय. अतिशय कठीण प्रसंगांचा साम...

सेन्सेक्स

  सेन्सेक्स विचारांचे Bull कधी Dominate करतात तर आचारांचे Bear सेन्सेक्स खाली पाडतात. हे वर खाली होण्यात जो जीवंतपणा आहे ना त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसाच्या ओठावर गुणगुणला जाणारा हा शब्द म्हणजे "सेन्सेक्स". रोजच्या दैनंदिन जीवनात तरुण वर्गापासून ते अगदी काठी टेकवत चालणार्या आजोबांपर्यंत एकदा तरी ज्याची आठवण काढतोच तो म्हणजे "सेन्सेक्स". "काय रे आज चढला का?" "का पडला?" ही दोन वाक्य प्रत्येकजण सध्या विचारतोच. तसं पाहिलं तर त्यावर काय रोजचे आयुष्य अवलंबून आहे तर अजिबात नाही. असं असून सुद्धा त्याचा एक चस्का लागला आहे सर्वांना. मार्केट, म्युचल फंड, फंड मॅनेजर, डिविडंट, कैडल चार्ट यांसारखे न कळणारे शब्द संग्रह सुद्धा सगळेजण सध्या लीलया वापरू लागले आहेत. साध्या भाजीवाल्या पासून ते मुकेश अंबानी पर्यंत सगळेच. अर्थात 1992 साला नंतर आलेल्या Globalisation निर्णयाचे हे स्वागतार्ह दूरगामी परिणाम आहेत. नकळतच आज सेन्सेक्स, तुमच्या आमच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊन बसला आहे. असा हा सेन्सेक्स त्याच्याबद्द...

मोदी तुमसे बैर नहीं! लेकीन....

 मोदी तुमसे बैर नहीं! लेकीन.... “What Got You Here Won't Get You There” ह्या जग विख्यात Marshall Goldsmith लेखकाच्या पुस्तकाचं उत्तम उदाहरण म्हणजे "नरेंद्र मोदी" तसं आमचं मूळ गाव बारामती म्हणजे  पणजोबा मूळचे बारामतीचे आणि वडिलांपासून आम्ही पुण्यात राहतोय. मी बारामती-कम-पुणेकर असल्यामुळे कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो की दोन गोष्टी आवर्जून करतो. एक स्थानिक पदार्थांची खव्वयेगीरी (पुणेकर) आणि दुसरी म्हणजे तेथील स्थानिक राजकारणाची हेरगिरी.  २०१८ला मी सहकुटुंब राजस्थानात गेलो होतो. राजस्थानच्या निवडणुकांचा प्रचार चालू होता. तेव्हा स्थानिक रिक्षावाले, पानवाले, ठेलेवाले ह्या सगळ्यांकडून एकच वाक्य कायम ऐकायला मिळत होते "मोदी तुमसे बैर नहीं!  लेकिन रानी तेरी खैर नहीं!". नंतर झालेही तसेच. भाजपने एवढा जोर लावूनही राजस्थानात अपयश आलेच आणि ह्याचे एकमेव उत्तर वरच्या स्लोगन मध्ये आहे.  २०१४च्या केंद्रातल्या दणदणीत यशानंतर पुढील काही निवडणुकांमध्ये पक्षानेही राज्या-राज्यात आपली गुढी सर्वत्र उभारली. २०१८नंतर मात्र चित्र फिसकटत गेलं. काय आणि का झालं हे ? हयाचा प्रामुख्याने सखोल विचार...

"अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे

 "अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर कोणी ही कितीही मोठा नामवंत खेळाडू असो परंतु कप्तान पदाला जे सहिष्णुता आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे गुण लागतात ते त्याच्यात असतीलच असे नाही. परंतु ज्याच्याकडे ते असतात तोच कठीण परिस्थितीत यशस्वी होतो. हया कसोटीच्या निकालाचे तात्पर्य काय असेल तर हे आहे. आपल्या सध्याच्या भारतीय खेळाडूंना तंबूत परत जाणं पक्कं माहितीय पण खेळपट्टीवर तंबू ठोकून कसं राहयचं हे राहणेंच्या अजिंक्य ने दुसऱ्या मॅच मध्ये दाखवून दिलं. दुसरा द्रविड सापडला की काय असा भास व्हावा इतकं अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड यांच्यात साम्य जाणवलं. तीच ती किरकोळ शरीरयष्टी, चेहर्‍यावरचे शांत-संयमी, भावना अती प्रकट न करणारे भाव आणि तंत्रशुद्ध खेळ. जडेजाच्या पन्नाशीच्या घाईत चांगला सेट झालेला रहाणे आउट झाला. परंतु सहकाऱ्यांकडून एखादी चूक घडली तर त्या चुकीसाठी मैदानावर प्रतिक्रिया न देणे. पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्या सहकाऱ्याला त्या चुकीची लाज वाटू नये याची खबरदारी घेत त्याच्या खांद्यावर एक विश्वासाने हात ठेवणे आणि "चलता है रे" असं करून पुढे जाणे.  ...

बारा दुणे बावीस??

बारा दुणे बावीस?? काही योगायोग जुळून आले तर "सोने पे सुहागा" असं आपण म्हणतो. असे योग जुळून यावेत असं आपल्याला वाटत असतंच असं नाही. पण समजा आलेच चुकून जूळून तर नक्कीच काहीतरी महत्वाकांशी घडेल याची जाणीव अथवा खात्री मात्र आपल्याला असते. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन तुल्यबळ व्यक्तिमत्त्वांच्या जोड्या आणि योगायोग असा की त्यांच्या जन्मदिवसाच्या तारखा सारख्याच. एक सर्वश्रुत असलेली तारीख म्हणजे १२. बारा म्हटलं की आठवते किंवा डोळ्यासमोर येते ते पुणे (MH-12), बारामती आणि १२डिसेंबर. हो बरोबर ओळखलंत! १२ डिसेंबर; अर्थातच माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस. तेवढेच वलय लाभलेला, जनमानसात तळागाळात रुजलेला आणि पक्षात नावाजलेला दुसरा माणूस अर्थातच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे. त्यांची पण जन्म तारीख १२ डिसेंबर.  निव्वळ योगायोग म्हणावा लागेल कि हि दोन्ही व्यक्तिमत्व आपापल्या पक्षात, राज्यस्तरीय राजकारणात अव्वल स्थानावर आणि राजकीय हाडवैरी. पण जन्मतारीख मात्र एकच १२ डिसेंबर. विचारसरणी, कार्यपद्धती, समाजकारण आणि राजकारण करण्याच्या शैलीत भिन्नता असूनही साम्य एकच १२ डिसेंबर. कदाचित ही दोन व्यक्त...

"आणि सज्ञान होतांना.."

"आणि सज्ञान होतांना.." पहिली एक दोन वर्ष सगळंच छान, गुडी गुडी असतं. नवीन असतं सगळंच. आजुबाजुचं वातावरण समजून घेणं, काही कळालं नाही तर विचारणं, मिळालं नाही तर हट्ट करणं. हट्ट पुरवणं आणि पुरवून घेणं. कसं छान निरगास असतं. थोडंसं काही झालं तरी लगेच रडू येणे, जराशी समजूत काढली की विसरून जाणं.... पुढे तिसर्या ते पाचव्या वर्षात बोलायला यायला लागतं.  एकमेकांचे शब्द समजतात.  मग एकमेकाशी बोलणं आणि एकमेकाला बोलणं दोन्ही सूरू होतं. थोडाफार अट्टाहास वाढतो. मी म्हणेन तेच खरं असं वागायला सुरुवात होते. बघा ना जसं मुल जन्माला आल्यापासून त्याची वाढ होत असते तसंच काहीसं वैवाहिक जीवनाची सुरुवात आणि वाढ होत असते. सहाव्या वर्षा नंतर मग ह्या दांपत्य जीवनाची शाळा सुरु होते. दरवर्षी नवीन इयत्ता, नवीन निर्मिति, नवीन अनुभव, नवीन शिक्षण आणि असं बरंच काही. एकमेकांचे अभ्यास करत, रोज एक नवीन परीक्षा देत. ती कधी पास तर कधी नापस होत पुढच्या वर्गात जाणं चालू असतं. असं करत करत दहा बारा वर्ष सरतात आणि Thirteen मधलं Teen Age  (किशोर वय) येतं. जरा स्थिर स्थावर झालेलं, एकमेकाला बर्यापैकी समजलेलं आ...

"वपुर्वाई"

"वपुर्वाई"             काल व.पु. काळेंची पुण्यतिथी होती. तशी ती दरवर्षीच येते. मग आजच का लिहिलं? एवढ्या वर्षात का नाही लिहिलं? किंवा मग पुढच्या वर्षी पण लिहणार का? वगैरे प्रश्न कोणाला जर पडले असतील तर त्याची उत्तरं त्यांनी माझ्या सदाशिव पेठेतल्या घरी येऊन घ्यावीत.  वपुंच्या भाषेत सांगायचं तर "लोक काय म्हणतील? याची पर्वा करायची नाही. म्हणजे माणसाला सुख लागतं" तसंच आज सुचलं, आज लिहिलं आणि आज तुमच्या समोर मांडतोय बस इतकंच. "गोली मार भेजे मे, भेजा शोर करता है.." हे सत्या मधलं गाणं मला नेहमी आठवतं. वपु समजायला आणि वाचायला हा भेजा कधीच कमी येत नाही. काळजात पोचणार असं हया माणसाचं लिखाण आहे म्हणून मग गोली मार भेजे मे असं म्हणून काळजातूनच ते वाचण्यात मजा आहे. जीवनात, तारुण्यात वपु येणे (पुस्तकंरुपी) हे कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यात असावं लागतं. ते मखमली गवतांवरचे फुलपाखरा सारखे, विविध फुलांवर उडण्याचे दिवस आणि सोबतीला वपुंचे एखादं पुस्तक. तुम्ही एकीकडे वाचत आहात आणि रोजचं उडणं चालू आहे.  अगदी कोणताही कथासंग्रह आणि त्यातली कथा घ्या, तुम्हाला तुमच्या आ...