Skip to main content

Posts

मोदी तुमसे बैर नहीं! लेकीन....

 मोदी तुमसे बैर नहीं! लेकीन.... “What Got You Here Won't Get You There” ह्या जग विख्यात Marshall Goldsmith लेखकाच्या पुस्तकाचं उत्तम उदाहरण म्हणजे "नरेंद्र मोदी" तसं आमचं मूळ गाव बारामती म्हणजे  पणजोबा मूळचे बारामतीचे आणि वडिलांपासून आम्ही पुण्यात राहतोय. मी बारामती-कम-पुणेकर असल्यामुळे कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो की दोन गोष्टी आवर्जून करतो. एक स्थानिक पदार्थांची खव्वयेगीरी (पुणेकर) आणि दुसरी म्हणजे तेथील स्थानिक राजकारणाची हेरगिरी.  २०१८ला मी सहकुटुंब राजस्थानात गेलो होतो. राजस्थानच्या निवडणुकांचा प्रचार चालू होता. तेव्हा स्थानिक रिक्षावाले, पानवाले, ठेलेवाले ह्या सगळ्यांकडून एकच वाक्य कायम ऐकायला मिळत होते "मोदी तुमसे बैर नहीं!  लेकिन रानी तेरी खैर नहीं!". नंतर झालेही तसेच. भाजपने एवढा जोर लावूनही राजस्थानात अपयश आलेच आणि ह्याचे एकमेव उत्तर वरच्या स्लोगन मध्ये आहे.  २०१४च्या केंद्रातल्या दणदणीत यशानंतर पुढील काही निवडणुकांमध्ये पक्षानेही राज्या-राज्यात आपली गुढी सर्वत्र उभारली. २०१८नंतर मात्र चित्र फिसकटत गेलं. काय आणि का झालं हे ? हयाचा प्रामुख्याने सखोल विचार...

"अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे

 "अजिंक्य रहाणे' आम्हाला पसंत आहे वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर कोणी ही कितीही मोठा नामवंत खेळाडू असो परंतु कप्तान पदाला जे सहिष्णुता आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे गुण लागतात ते त्याच्यात असतीलच असे नाही. परंतु ज्याच्याकडे ते असतात तोच कठीण परिस्थितीत यशस्वी होतो. हया कसोटीच्या निकालाचे तात्पर्य काय असेल तर हे आहे. आपल्या सध्याच्या भारतीय खेळाडूंना तंबूत परत जाणं पक्कं माहितीय पण खेळपट्टीवर तंबू ठोकून कसं राहयचं हे राहणेंच्या अजिंक्य ने दुसऱ्या मॅच मध्ये दाखवून दिलं. दुसरा द्रविड सापडला की काय असा भास व्हावा इतकं अजिंक्य रहाणे आणि राहुल द्रविड यांच्यात साम्य जाणवलं. तीच ती किरकोळ शरीरयष्टी, चेहर्‍यावरचे शांत-संयमी, भावना अती प्रकट न करणारे भाव आणि तंत्रशुद्ध खेळ. जडेजाच्या पन्नाशीच्या घाईत चांगला सेट झालेला रहाणे आउट झाला. परंतु सहकाऱ्यांकडून एखादी चूक घडली तर त्या चुकीसाठी मैदानावर प्रतिक्रिया न देणे. पुढे जाऊन मी असं म्हणेन की त्या सहकाऱ्याला त्या चुकीची लाज वाटू नये याची खबरदारी घेत त्याच्या खांद्यावर एक विश्वासाने हात ठेवणे आणि "चलता है रे" असं करून पुढे जाणे.  ...

बारा दुणे बावीस??

बारा दुणे बावीस?? काही योगायोग जुळून आले तर "सोने पे सुहागा" असं आपण म्हणतो. असे योग जुळून यावेत असं आपल्याला वाटत असतंच असं नाही. पण समजा आलेच चुकून जूळून तर नक्कीच काहीतरी महत्वाकांशी घडेल याची जाणीव अथवा खात्री मात्र आपल्याला असते. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन तुल्यबळ व्यक्तिमत्त्वांच्या जोड्या आणि योगायोग असा की त्यांच्या जन्मदिवसाच्या तारखा सारख्याच. एक सर्वश्रुत असलेली तारीख म्हणजे १२. बारा म्हटलं की आठवते किंवा डोळ्यासमोर येते ते पुणे (MH-12), बारामती आणि १२डिसेंबर. हो बरोबर ओळखलंत! १२ डिसेंबर; अर्थातच माननीय शरद पवार साहेबांचा वाढदिवस. तेवढेच वलय लाभलेला, जनमानसात तळागाळात रुजलेला आणि पक्षात नावाजलेला दुसरा माणूस अर्थातच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे. त्यांची पण जन्म तारीख १२ डिसेंबर.  निव्वळ योगायोग म्हणावा लागेल कि हि दोन्ही व्यक्तिमत्व आपापल्या पक्षात, राज्यस्तरीय राजकारणात अव्वल स्थानावर आणि राजकीय हाडवैरी. पण जन्मतारीख मात्र एकच १२ डिसेंबर. विचारसरणी, कार्यपद्धती, समाजकारण आणि राजकारण करण्याच्या शैलीत भिन्नता असूनही साम्य एकच १२ डिसेंबर. कदाचित ही दोन व्यक्त...

"आणि सज्ञान होतांना.."

"आणि सज्ञान होतांना.." पहिली एक दोन वर्ष सगळंच छान, गुडी गुडी असतं. नवीन असतं सगळंच. आजुबाजुचं वातावरण समजून घेणं, काही कळालं नाही तर विचारणं, मिळालं नाही तर हट्ट करणं. हट्ट पुरवणं आणि पुरवून घेणं. कसं छान निरगास असतं. थोडंसं काही झालं तरी लगेच रडू येणे, जराशी समजूत काढली की विसरून जाणं.... पुढे तिसर्या ते पाचव्या वर्षात बोलायला यायला लागतं.  एकमेकांचे शब्द समजतात.  मग एकमेकाशी बोलणं आणि एकमेकाला बोलणं दोन्ही सूरू होतं. थोडाफार अट्टाहास वाढतो. मी म्हणेन तेच खरं असं वागायला सुरुवात होते. बघा ना जसं मुल जन्माला आल्यापासून त्याची वाढ होत असते तसंच काहीसं वैवाहिक जीवनाची सुरुवात आणि वाढ होत असते. सहाव्या वर्षा नंतर मग ह्या दांपत्य जीवनाची शाळा सुरु होते. दरवर्षी नवीन इयत्ता, नवीन निर्मिति, नवीन अनुभव, नवीन शिक्षण आणि असं बरंच काही. एकमेकांचे अभ्यास करत, रोज एक नवीन परीक्षा देत. ती कधी पास तर कधी नापस होत पुढच्या वर्गात जाणं चालू असतं. असं करत करत दहा बारा वर्ष सरतात आणि Thirteen मधलं Teen Age  (किशोर वय) येतं. जरा स्थिर स्थावर झालेलं, एकमेकाला बर्यापैकी समजलेलं आ...

"वपुर्वाई"

"वपुर्वाई"             काल व.पु. काळेंची पुण्यतिथी होती. तशी ती दरवर्षीच येते. मग आजच का लिहिलं? एवढ्या वर्षात का नाही लिहिलं? किंवा मग पुढच्या वर्षी पण लिहणार का? वगैरे प्रश्न कोणाला जर पडले असतील तर त्याची उत्तरं त्यांनी माझ्या सदाशिव पेठेतल्या घरी येऊन घ्यावीत.  वपुंच्या भाषेत सांगायचं तर "लोक काय म्हणतील? याची पर्वा करायची नाही. म्हणजे माणसाला सुख लागतं" तसंच आज सुचलं, आज लिहिलं आणि आज तुमच्या समोर मांडतोय बस इतकंच. "गोली मार भेजे मे, भेजा शोर करता है.." हे सत्या मधलं गाणं मला नेहमी आठवतं. वपु समजायला आणि वाचायला हा भेजा कधीच कमी येत नाही. काळजात पोचणार असं हया माणसाचं लिखाण आहे म्हणून मग गोली मार भेजे मे असं म्हणून काळजातूनच ते वाचण्यात मजा आहे. जीवनात, तारुण्यात वपु येणे (पुस्तकंरुपी) हे कोणत्याही व्यक्तीच्या भाग्यात असावं लागतं. ते मखमली गवतांवरचे फुलपाखरा सारखे, विविध फुलांवर उडण्याचे दिवस आणि सोबतीला वपुंचे एखादं पुस्तक. तुम्ही एकीकडे वाचत आहात आणि रोजचं उडणं चालू आहे.  अगदी कोणताही कथासंग्रह आणि त्यातली कथा घ्या, तुम्हाला तुमच्या आ...

T(ती)चा चहा

T(ती)चा चहा       "रुपाली, आज असा काय झालायं गं चहा! नेहमीसारखा नाही झालाय. बघ काहीतरी कमी आहे, काय ते सांगता येत नाही". असं जेव्हा असतं ना 'काय ते सांगता येत नाही' ही चव ज्याची त्याची असते. तो किंवा ती कोणीही असेल ती ते नीट सांगू शकत नाही. 'चहा' आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक.  म्हणे चीनमध्ये त्याचा शोध लागला आणि साहेबांनी म्हणजे ब्रिटिशांनी त्याला भारतात आणला. तो हा चहा, चाय, टी आणि अशी बरीच काही नाव आहेत त्याला.  या चहाची एक चव असते विविध प्रदेशात, विविध लोकांना, विविध वेळी आणि विविध ठिकाणी वेगवेगळी ती असते. कोणाला खूप गोड आवडतो तर कोणाला कडक स्ट्रॉंग लागतो.  कोणाला वेलची घातलेला तर कोणी मसाला घातलेला. कोणाला आलं (अद्रक) पाहिजेच चहात. कोणाला दुधाचा तर कोणी बिन दुधाचा. लेमन टी, ग्रीन टी, जास्मीन टी वगैरे वगैरे. अजून असे चहाचे बरेच प्रकार आहेत पण 'ज्याचा त्याचा चहा वेगळाच असतो'. आणि काही झालं तरी त्याला तोच चहा आवडतो.  कोणाकडे पाहुणे म्हणून आपण गेलो की चहा दिला जातो. अगदी तो चहा पिऊन सुद्धा आपण त्यांचे आदरातिथ्य आणि ते कुटुंब कसे आहे ते ठरवत ...

मकबूल फिदा खान....

मकबूल फिदा खान.... हॉलीवूड मधील डेंजील वॉशिंग्टन हे नाव असं आहे की, "एखादा इंग्लिश मूवी बघू, अरे डेंजील वॉशिंग्टन आहे का? चल भारी असेल मग". जरा तसंच हिंदी पिक्चरच्या वेळेस "इरफान आहे का? तर मग बघूच, चांगला असेल नक्की" असं वाटावं असा Born Actor.  ज्याच्या फक्त नावामुळे पिक्चर बघावा, त्या पिक्चर मध्ये आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं वाटावं. वास्तववादी पिक्चर बघायची ज्यांना आवड आणि नशा आहे ना, त्यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीने काही हिरे नेहमीच राखून ठेवलेले आहेत. अर्धसत्य मधला घामाघूम होवून धावत पळणारा इन्स्पेक्टर ओमपुरी असेल, "मुंबई का किंग कौन? भिक्कू म्हात्रे" म्हणणारा मनोज वाजपेयी असेल, सरकार मधला के के मेनन असेल, नाहीतर मग "भाई.. सोडा बाॉटल की किंमत तब तक जबतक की वो बंद...जैसे ही बुच खुला...फुस्स..झाग बह जाता है...रह जाता है क्या...पानी" वाला आन मधला पठाणवाडीतला पठाण इरफान खान असेल. हया सर्वांचा एक वेगळाच वरचा क्लास आहे. म्हणजे दहावी फ असून सुद्धा हे सगळेजण बोर्डात आलेले आहेत. हो बरोबर ओळखलंत..आज इरफान खान. उत्तर प्रदेश मधील पठा...