Skip to main content

Posts

वेड....."अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला."

वेड 11/02/2019 "अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला." "काय ना! या अभिजीतचं वेड काय विचारू नका. सुट्टी असली ना! की हा असाच तासनतास वरच्या खोलीत जाऊन बसलेला असतो." "किती वाचन करावे म्हणते मी.  वेड लागलय वाचनाचं नुसतं. जे नवीन जुनं पुस्तक मिळेल ते तो वाचतो आणि दोन दोन तीन तीन दिवसात संपून टाकतो." "अहो घारे काकू, असू दे. त्याच्या वाचनाचं आणि एखादा विषय स्पष्ट उलगडून सांगण्याच्या स्टाईल मुळे तर तो कॉलेजमध्ये आम्हा मित्रांमध्ये आणि शिक्षकांमध्ये फेमस आहे" असे कित्येक अभिजीत सध्या कमी होत आहेत. "चांगले बोलू शकतात पण त्यात सकसपणा नाही आणि चांगले लिहू शकतात पण त्यात स्निग्धता नाही" अशी अवस्था आहे. गेल्या दहा बारा वर्षात आणि नव्वदच्या दशकानंतर जन्मलेल्या सर्वच मुला-मुलींच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावते आहे.  प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्या नाटके कथा संग्रह आत्मचरित्र किंवा प्रवासवर्णनांची छोटी छोटी पुस्तकं वगैरे तर सोडाच पण साधा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाही. एक वेळ अशी होती की भेळपुरी च्या राहिलेल्या कागदावर...

आणि सुबोध भावे......"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू

"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू होता. मी जोरात ओरडलो 'जोश्या ही पारू कोण आहे रे स्टेजवर? च्यायला काय दिसतेय यार! शेजारच्या मुलींच्या हुजूरपागा शाळेतून कोणाला बोलावलयं का खास या डान्स साठी.?" "अरे बुध्द् या नाही रे...तो आपल्या वरच्या वर्गातला भावे आहे." सुबोधचा कदाचित रंगमंचावरचा हा तो पहिलाच परफॉर्मन्स असेल. तो त्या पारूच्या वेशात इतका सुंदर दिसत होता की आता खात्री पटते की बालगंधर्व त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं. अगदी आपले बनवाबनवी वाले महागुरु सुद्धा नाही. पुण्याच्या पेठी वातावरणात आणि एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा नूमविय सुबोध, आज मराठी रंग-चित्रसृष्टी वर एक हाती राज्य करतोय. आमचा हा आनंद फक्त अस्सल पुणेरी नुमवियंनाच कळू शकतो. तेव्हा नाही पण आता सुबोधला जवळून ओळखणारे पुण्यात अचानकच "खूप" झालेत. एक काळ असा होता की तो भरतच्या बाहेर (भरत नाट्यगृह, पुण्यातील लोकांना भरत म्हंटलं की रामायण नाही आणि मस्तानी म्हंटलं तर बाजीराव नाही...तर सदाशिव पेठ हे कळते. ) टपरीवर ...

"चिमटा" (काल्पनिक विडंबन)....काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली

काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली कळालेच नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात सभागृहात त्या विषयावर चर्चा आहे. त्यामुळे गेला आठवडा पासून त्या ५००-६०० फाइलींचा स्टडी करतोय. अचानक जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं, फ्रेश होउन बाहेर आलो, बघतो तर सौ. गाण्याच्या रेकॉर्डिंग ला आणि मुलगी शाळेला गेलेली. म्हणजे नक्कीच खूप उशीर झालेला उठायला. नेहमीप्रमाणे आंघोळ पुजा आटपली आणि ब्रेकफास्ट टेबलावर बसलो. आज आवडीचे "तर्री पोहा" होते नाष्ट्याला. खात असतानाच प्रवीण (आमचा पी ए) आला, दिवसभराचे शेड्युल अपडेट करायला. "साहेब, आज ह्या दोन महामंडळाचे कार्यक्रम आहेत, मग ही तीन ठिकाणी उद्घाटने, पक्ष कार्यकर्ते बरोबर बैठक आणि संध्याकाळी पाटील साहेबांकडे पुजेच्या तीर्थ प्रसादाला जायचे आहे." आम्ही अक्षरशः आ वासून बघतच राहिलो त्याच्याकडे, तोंडात पोह्यांचा घास तसाच. प्रवीण घाबरून म्हणाला"साहेब, काय झालं, काही होतयं का?" "अरे, काय झालं, काहीच झालं नाही का? आज एवढेच बाकी काही नाही? कोणता मोर्चा नाही? आंदोलकांबरोबर चर्चा नाही; दूध भाजीपाला वगैरे रस्त्यावर ...

ओह माय लॉर्ड(स्).......इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोल

इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते. एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका  त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट. आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते. आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा. आयपीएल आणि टिट्...

फादर्स डे निमित्त.. मी...बाबा आणि बाईक (काल्पनिक) ......आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर

आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर सुसाट चालवायला सुरुवात केली. का कुणास ठाउक, अचानक बाबाची आठवण आली. तो सुद्धा रस्ता मोकळा असला की असाच पळवायचा त्याची लाडकी यामहा 100. काय ते प्रेम त्या काळ्या ठेंगण्या ठुसक्या यामहावर. स्वतः च्या मुलीप्रमाणे जपायचा तीला. माझी धाकटी बहीणच जणू. पुण्यात आल्यावर बाबांनी पहिली घेतलेली आणि शेवटपर्यंत तीच वापरली. काळापरत्वे आमच्या कडे दोन टु व्हीलर आणि एक मोठी फोर व्हीलर आली पण बाबाची यामहा कायम चालू कंडिशनमधे.तो वापरायचा आठवड्यात किमान दोन तीन वेळा. मला, रोहीत आणि आईला यामहावर लांब लांब घेऊन जायचं त्याला फार आवडायचं. त्यात त्याला शान वाटायची. कोकणातील नागमोडी वाटा, महाबळेश्वर पसरणी घाट, भर पावसात आम्हाला भिजत फर्स्ट सेकंड टाकत सिंहगडावर नेलेलं अजुनही मनात घट्ट आहे. तो कोणालाही ती वापरायला द्यायचा नाही, मला आठवतंय ते फक्त बाबाचा बेस्ट फ्रेंड सुहास काका कधीतरी चालवायचा. दर रविवारी यामहा स्वच्छ धुवायची, आयलींग ग्रीसींग करायचं. आधी काही वर्ष साध्या आईल नी पुसुन चकाचक करायचा. पुढे मग त्याला बाइक शायनिंग क्रिम मिळाले. त्यांच्या परदेशात...

१६ ऑगस्ट २०१८..........."अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी

"अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी. व्हाट्सएप वर, फेसबुकवर, सगळीकडे पब्लिक चं स्टेटस, फोटो, RIP, आदरांजली च्या भावना मुसळधार वाहत होत्या. इतक्या की सध्या केरळ मधे पडणारा पाऊस पण क्षणभर थबकला. अगदी साठ वर्षाच्या आजोबांपासून ते नुकतंच मिसुरडं फुटलेल्या नातवापर्यंत सगळेच हळहळले. खरोखर कालातीतच नेता होते अटलजी. अंतयात्रेला प्रचंड जनसागर ओसंडून पसरला होता अगदी पोलीस एसपीजी कमांडोचा कडेकोट बंदोबस्तात. परंतु त्याचवेळेस सवासौ करोड भारतीयांच्या मनात जो मुक भवसागर उसळला होता तो कोणीच थांबवू शकणारं नव्हतं. तो चिरंतन राहील आणि भविष्यात विविध प्रसंगी तो डोळ्यातून झिरपेलच. काल कश्मीर ते कन्याकुमारी आणि कोलकता ते जामनगर पहिल्यांदाच गदगदलं. स्वातंत्र्योत्तर काळात पक्षांच्या पलिकडे जाणारे जे नेते झाले त्यात अटलजी अव्वल नंबरात होते. त्याच्या वाटेला आलेल्या सत्तेचा विरोधकांनी नेहमी "तेरावा" घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यातल्या अलगद मनाच्या कवीने त्या गोष्टी मनावर न घेता कायमच माणुसकीचा राजधर्म पाळला. एक व्यक्ती...

पुण्यात "दिक्षित Diet".......सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची

सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची यथेच्छ चुळ भरली दुकानासमोर. एकदम जोरात सुरुच झाला.. "धक धक करने लगा। ओ मोरा जियारा डरने लगा । संज्या, अन्या छोड ना तू दीक्षित की माधुरी बोल ना..." अरे पक्या काय बे हे नवीन खुळ.. विक्या तु वाचलं का..भावा पुण्यात माधुरी उभी रहणार २०१९ ला... च्यायला विकी हे म्हणजे दुधात रम घालून प्यायलेल्या त्या घाणेकर पेग सारखं रे... एकदम कडडेक... परत कोणी विचारलं तर मानेला झटका दिला आणि म्हटलं "उस्मे क्या है" कि झालं. मला आत्ताच कसं कसं होतं लेका. ती प्रचारासाठी पुण्यात सभा घेणार. प्रभात फेऱ्या सांज फेऱ्या दुपार फेऱ्या मारणार वेगवेगळ्या प्रचारफेऱ्या मारणार. साला जिची एक झलक मिळावी यासाठी आपण कित्येक मुंबई ट्रिप मारल्या. ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर तीच्या पिक्चरच्या गप्पांवर वील्सची पाकिटं संपवली. गुडलकच्या त्या कासिमशेटच्या चहाच्या उधार्या केल्या आणि जिंदगीभर झुरलो ती. ती माधुरी साक्षात आपल्याच शहरात आपल्याला जवळून दिसणार. मानलं भावा आपण ह्या दाढीवाल्या जोडीला. काय खेळी केलीय.. चि...