Saturday, January 26, 2019

मराठी भाषा दिनानिमित्त!

आद्य हि भाषा, संस्कृत जीची जननी
हिंदी, अरबी, पाली जीच्या भगीनी
अटकेपार जीचा झेंडा रोवूनी
पालक मरहाटा, आला जग जिंकोनी
तीच्यात बाळातल्या *ळ* चा गोडवा
तर बाणातल्या *ण* चा धारवा
तीची अक्षरे मुळ बारा आणि
बाराखडीत मांडलेला जगपसारा हा सारा
अलंकार, उपहास, समास अश्या विविध तीच्या छटा
जणू सौंदर्यवतीच्या चेहर्यावर घरंगळणार्या लोभस बटा
तीच्या सामर्थ्याची काय सांगू मी कहाणी
उलगडली भगवतगीता तीच्यातून संतांनी
शुद्ध अशुद्ध अशी जीची समतोल बांधणी
ओठी वसे ती, शिक्षीत असो वा अडाणी
अशी ही आमची माय मराठी भाषा
धमन्यात धावती तीच्या अभिमानाच्या रेषा
---मिलिंद सबुध्दे

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...