Saturday, January 26, 2019

काही मनातल्या आरोळ्या

जश्या कवितेत चारोळ्या
तश्या ह्या काही मनातल्या आरोळ्या..
१।।
वहिवाटेवरचे खडे बोचत असतात 
हळूहळू त्याचीच चटक लागते
वळणावर मी एखादी नवी वाट शोधतो, काही बोचलं नाही, तर चुकलो की काय? वाटावे, इतकी चटक...
२।।
आनंदाश्रू वाहत असतात डोळ्यातून ओघळतात गालावरून
विचित्र वाटते अचानक
कारण, जीभेला त्या खार्या पाण्याचीच चव माहीत असते
३।।
गर्दी मध्ये उत्साह आपल्या नावाचाच गजर
सर्वच जण आपल्याकडे बघतायत...
मला मात्र मुखवटे मागचे चेहरेच दिसत राहतात आणि आपसुकच पोकळ सुहास्य माझ्या चेहर्यावर मुखवटा चढवतं..
---मिलिंद सं$बुध्दे

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...