Saturday, January 26, 2019

रंगीबेरंगी

२०१८ मधे... सहज सुचलेलं..
रंगीबेरंगी कॉकटेल...🍹🍹
आपण एखाद्याला *द्रुष्टी* 🤓 देऊ शकतो
पण...*द्रुष्टीकोन* 😇 नाही
--
तुम्ही, एकदा का समोरच्या प्रत्येकाला "सर" म्हणायला शिकलात..
की.........."सरसर" वर पोहचतां।
--
एकेकाळी *फोटो* *काढायला* माणूस ठेवायचे..आणि
आता (_mobile मधून_) काढून *टाकायला* ठेवतात...
--
कोकणस्थ कसा ओळखाल....
ज्याच्या हेडफोन कॉर्डचा आणि विचारांचा कधीही गुंता झालेला नसतो..
--
तेव्हा...
आमच्या घरचा *गणपती*
सध्या...
आमचा घरचा *बाप्पा*
--
साम्यवाद, समाजवाद, पुंजीवाद, राष्ट्रवाद
ह्यांच्या पेक्षा *धन्यवाद* अधिक माणुसकी जपतो |
--
सध्या जीला *ट्रोल* करण्याची हिंमत कोणात नाही अशी बहुमुल्य गोष्ट म्हणजे
*पेट्रोल*
--
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात
आपण ठरवायचं की आपल्या *छाप्याची* सिंहांची बाजू बघायची आहे
का?
*काट्याची* बघून ते पंचवीस पैशाचं का बंदा रुपाया ह्याची चिंता करायची आहे
--
मी सच्चा सैनिक आहे आणि फक्त *मातोश्री* चे आदेश मानतो
बायको म्हणते *You are Moma's Boy*
--
*जळणे* हा गुणधर्म तसा वाईट नाही।
फरक इतकाच की *जळून...*
उदबत्ती सारखं .. *दरवळताय*।
का
लाकडा सारखं..*कोळसा* करताय।
--
*सम* आकड्या सारखं जगावं..
मग..
कीतीही मोठ्या *विषम* संख्येबरोबर गुणलं तरी
आयुष्यातील उत्तरं *सम* च येतात।
--
भावना आणि रंग दोन्हीमध्ये साम्य विविधतेचं असतं..
तुम्ही कसं मांडताय त्यावर दारासमोर किंवा जीवनात रांगोळी तयार होते...
--
एक प्रवास असतो प्रत्येकाचा, प्रवास जेव्हा धेय्य बनतं तेव्हा त्याची सफर होते, सफरीचा जेव्हा आनंद घ्यायला सुरवात होते तेव्हा यशाच्या पायर्या चढायला सुरवात होते...आणि मग काय, प्रत्येक पायरी गणिक नवीन किर्तीमान प्रस्थापित होतात...
--
"वर"..."चष्मा" काढून ठेवाल तर सगळं स्पष्ट दिसेल
--
शेवटी निघतांना जेव्हा काही micoseconds क्षणांत जी नजरानजर होते,
त्यात पुढच्या भेटीची आश्वासकता असते...😊
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏
--बुध्दे महाराज की जय।
....©मिलिंद सहस्त्रबुद्धे

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...