ने मजसी ने....।सागरा प्राण तळमळला....
तळमळला प्राण ऐकूनी तुमच्या
आयुष्याची ज्ञाती
बारा हजार प्रुष्ठांचे साहित्य लिहणारा एकमेव नेता अशी ख्याती।
तळमळला प्राण ऐकूनी तुमच्या
आयुष्याची ज्ञाती
बारा हजार प्रुष्ठांचे साहित्य लिहणारा एकमेव नेता अशी ख्याती।
करून मुलाचा अंत्यसंस्कार चौथ्या वर्षी होईल का कोणाचे मन हर्षी,
बैरीस्टर होवूनी ही तीसाव्या वर्षी ।
बैरीस्टर होवूनी ही तीसाव्या वर्षी ।
सत्तावीस वर्षे तुरुंगातली, जणू सत्तावीस नक्षत्रे हिंदू साहित्या मधली
अखंड तळपत होता सरस्वतीचा सुर्य
अंदमानाच्या क्षितिजावरती ।
अखंड तळपत होता सरस्वतीचा सुर्य
अंदमानाच्या क्षितिजावरती ।
हिंदू म्हणवुन घेणारे आम्ही, नाही कळला आम्हास तयाचा अर्थ
"हिंदुत्व" लिहून तुम्ही दाखविलात माणुस धर्मातला परमार्थ ।
"हिंदुत्व" लिहून तुम्ही दाखविलात माणुस धर्मातला परमार्थ ।
कालातीत होतात तुम्ही, वदलात तेहतीस कोटी देव नव्हे, तर गाय हा पशु उपयुक्त
सर्वजनांच्या उध्दारा करीता पतितपावन बांधणारे द्रष्टे, तुम्ही जानव्याचे भक्त।
सर्वजनांच्या उध्दारा करीता पतितपावन बांधणारे द्रष्टे, तुम्ही जानव्याचे भक्त।
ब्रिटिशांनी अजूनही जपले, तुमची वास्तु आणि ग्रंथ कार्य
हळहळून म्हणती,
आमच्या देशी का जन्माला नाही
हा तेजोमय आर्य ।
हळहळून म्हणती,
आमच्या देशी का जन्माला नाही
हा तेजोमय आर्य ।
---मिलिंद सबुध्दे
२६ फेब्रुवारी - स्वातंत्र्यवीर विदा सावरकर पुण्यतिथी निमित्त, माझे विनम्र अभिवादन।
२६ फेब्रुवारी - स्वातंत्र्यवीर विदा सावरकर पुण्यतिथी निमित्त, माझे विनम्र अभिवादन।
Comments
Post a Comment