Saturday, January 26, 2019

नव्वदीच्या Dolby वाल्या म्हणी आणि आम्ही...

"हार कर जीतने वाले को बाजीगर कहैते है"। हया एका वाक्यामुळे आमच्या सारखे average 70% वाले सुध्दा स्वतःला extra ordinary समजू लागले..Thanks SRK
"Friendship मै नो sorry नो thank you" 
हे वाक्य धतींग करत म्हणता यावे म्हणून college canteen मध्ये चहा वडापाव पार्ट्या देउन, उधार्या झाल्या आमच्या..
पण आमचे भाग्य(श्री) कधीच उजळले नाही...
"जुते दे दो पैसे ले लो"....
ह्या गाण्यानंतर तर उगाच सगळ्याच लग्नात बूट लपवण्याचा shot सुरु झाला....आणि हम आप के है कौन म्हणत..आमच्या सारख्या मी मराठी वाल्यांनी जीजू शब्दाचे चींगम केले..
"मर गया राहुल".....
आमच्या college canteen मधे मग सचिन, सतीश, विकास वगैरे सगळेच राहुल.. गांधी नोट खर्च करु लागले...
खरंच आता वाटतयं वय तर पागल है।
"बडे बडे शहरो मै छोटी छोटी बाते होती रहती है"....
Engineering second year M3 down, मग काय आपण टाकला हा डायलॉग ताईसमोर, बाबांनी मागून येउन जोरात मारलेली टप्पल अजून याद आती है।
नंतर बर्याच वर्षांनी RRआबांना पण अनुभव आला.. पत्रकार खुर्ची ले जाएंगे...
१४ फेब्रुवारी आणि पोर्णिमा एकाच दिवशी आले कि तो आमच्या सारख्या friendship to loveship वाल्यांसाठी साडेतीन मुहूर्त पैकी ऐक असतो म्हणे......
Thanks YRF
नवीन लग्न झालेल्या शेजारच्या मराठी काकू अचानक "करवा चौथ" साठी तुळशी बागेतून खास चाळण घेउन आल्या...
त्या दिवशी काकांना हम दिल दे चुके मधला सलमान झाल्या सारखे वाटलं..
असो..
पण खरंच DDLJ मधल्या अमरीश पुरींच्या खर्ज्या आवाजतल्या "जा सिम्रन जा.. जी ले अपनी जिंदगी" सारखे आम्ही त्याकाळी स्वप्नवत मनमुराद जगलो
Thanks Bollywood
---मिलिंद स$बुध्दे

No comments:

Post a Comment

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...