Skip to main content

Posts

फाइल्स Reopened - Kashmir Files

  #latepostednow फाइल्स Reopened सिनेमाची सुरुवात त्याच्या क्लायमॅक्स पासूनच होते. ती सुरुवात होते तुमच्या आमच्या मनात. सिनेमाचा शेवटचा सीन संपतो आणि अचानक दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अशी पाटी येते. खरं सांगायचं तर आधीच्या तीन तासात आपण कलम ३७० आणि काश्मीरमय होऊन जातो. १९९०च्या काश्मीरमधील आपण जणू एखादा स्टींग ऑपरेशनचा कॅमेरा किंवा खोर्यातील पानझडी झालेलं सूरुचं झाड झालेलो असतो. एक एक प्रसंग पुढे पुढे सरकत असतात आणि साधारण पावणेतीन तास झाल्यावर अंगावर काटा आणणार्या एका प्रसंगानंतर अचानक ब्लॅक आऊट होतं. "फिल्म निर्माण विवेक अग्निहोत्री" अशी पाटी येते. अख्खं थिएटर भानावर येत. एकदम लक्षात येतं की "अरेच्या आपण थिएटरच्या खुर्चीत बसलो आहोत". लाइट्स ऑन होतात. प्रेक्षक जागेवरच बसलेले दिसतात. काही मिनिटांनी एक एक जण उठत जातो. आपणही थिएटरच्या बाहेर पडतो. परंतु सिनेमाला इथूनच सुरुवात झालेली असते. तीन तास बघितलेला विविध पात्रांचा, प्रसंगांचा, ठिकाणांचा आणि वातावरणाचा एक मुक सिनेमा आपल्या प्रत्येकाचा मनात सुरू होतो. तसं पाहिला गेलं तर १९९० साल म्हणजे फारसं लांब नाही. इतिहासात...

अनिल अवचट - मी आणि बाबा

  मी आणि बाबा खरंच असं जगता येईल का? हा एकमेव प्रश्न मनात घर करून राहिला. काल शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदर दिलेला फोटो open केला. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे अजून दोन चार ग्रुप वर "शास्त्र असतं ते" नियमाप्रमाणे Forward देखील केला. इतका सोपं असू शकतं का जगणं? विचार करणं? असं सतत मनाला वाटत राहीलं. घरासमोरची काढलेली सुंदर रांगोळी, कौतुक करायला "अरे वा छान काढलीय" "आज 32 ठिपक्यांची का?" "रंग मस्त भरलेत" वगैरे म्हणणारं कोणीही नाही. परत कुणीतरी येणारा जाणारा चालतांना चुकून पुसून जाणार. तरीही कोणतीही चिडचिड, मनात खंत न बाळगता उद्या तशीच नवीन सुंदर रांगोळी काढायची. काय असेल ना! अनिल अवचट (बाबा), त्यांनी जे मुलाखतीत म्हटलंय ते आत्मसात करणं खूप अवघड आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात म्हणाल तर Impossible आहे. स्वतःच्या आई कडून शिकलेली "आनंदी राहण्याची" गोष्ट कदाचित त्यांच्या रक्तात कायमची भिनून गेली असावी. "एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद बाकी कोणी कौतुक केलं पाहिजे असं काही नाही" हे जीवनाचं मुल्य ठरवून बाबा कायम ज...

Adv OR Skip Ad ->>

  Adv OR Skip Ad ->> दररोज सकाळी दारात पडणारं वर्तमानपत्र आणि ठरलेला तक्रार वजा संवाद "हल्ली ना, पेपरात जाहिरातीच जास्त आणि बातम्या कमी." संध्याकाळी ठरलेल्या वेळेत लागोपाठ चार सिरीयल बघणाऱ्या बायकासुद्धा जाहिराती आल्या की एक प्रकारे चिडतात. "काय बाई अर्धा तासाची सीरीअल आणि जाहीरातीच निम्म्यावेळ..मग चालणारच ह्या वर्ष वर्ष भर." एवढं सगळं असलं तरी आपण नियमितपणे वर्तमानपत्र घेत असतो, रोज पुन्हा नव्याने सीरीअल बघणं चालूच असतं. वर्षभराच्या सवलतीवर मिळते म्हणून अजूनपण एखादे वर्तमानपत्र आपण लावतो आणि लागोपाठ चार चार सिरीयल बघत असतो. मग हया जाहिरातींचं एवढा वाईट का वाटतं? जाहिरात म्हटलं की मला मी आठवतं ते म्हणजे लहानपणी पेपर वाचायला लागलो की आई-बाबा ओरडायचे "काय रे! काय बघतोयस? त्या सिनेमा नाटकाच्या जाहिराती बघू नको सारख्या." त्याकाळीसुद्धा ठराविक पानांवर पानभर नाटक सिनेमाच्या भरगच्च जाहिराती असत. त्यात आपण किशोर वयात कोणत्या बघायचो हे तुम्हाला नक्की आठवत असणार. आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे जाहिरात. कदाचित आपण आपली बरीचशी मतं हया जाहिरातींवर ...

#चिंधी #स्फुटलेखन

# चिंधी चिंधीला जी आपुलकी असते,ती बॅंडेड पट्टीला असूच शकत नाही.  चिंधीला मायेची उब असते, तर बॅंडेड पट्टीला औषधांचा दर्प. ही उब, ही माया "ती"च्या हाताची असते. लहानपणी आई, किशोर वयात बहीणाबाई, तरुणपणी प्रेयसी तर पुढे झालेली सहचारिणी आणि उतारवयात  मुलगी.  आयुष्यात मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आप्तेष्ट-परिवार कधी बरोबर असतात तर कधी नसतात.  कटु अनुभव, तर दुःखद प्रसंगी माणसाला खरी गरज असते ती कोणीतरी चिंधी बांधायची.  साधारणत: भेटतात ते सगळेच बॅंडेड पट्टी लावणारे असतात. अश्या वेळी अनुभव आणि सहकार्याची हळद लावून आधाराची चिंधी बांधाणारं कोणी असलं कि दु:ख हलकं तर होतंच आणि पुढे जाऊन त्या कटूतेची तीव्रता राहात नाही. जखम बरी होईपर्यंत चिंधी चिकटून राहते, बॅंडेड पट्टी सारखी रोज बदलावी लागत नाही. एकदा का बरं झालं की ती आपण फेकून देतो.  जखम बोच ठेवून जाते पण चिंधीचा स्पर्श लाभला तर व्रण राहात नाहीत. तिन्ही जगाचा स्वामी, नारायणाला सुध्दा भुतलावर येऊन चिंधीची माया अनुभवायची इच्छा झाली. म्हणून तर ते काव्य आहे "चिंधी बांधते द्रौपदी, हरीच्या (श्रीकृष्ण) बोटाला.." - मिलिंद सहस्रबु...

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...

"आणि विजय पराभूत..."

 दिवाळी विशेष 🙏 "आणि विजय पराभूत..." नव्वदच्या दशकात रंगीला सिनेमांमध्ये आमिर खानचा एक डायलॉग फेमस झाला होता. तो पिक्चरच्या थिएटर बाहेर ब्लॅकनी तिकीटं  विकत असतो. "दस का बीस, बाल्कनी बीस का तीस, सिर्फ दो बची है".  एकजण येतो आणि विचारतो "ऐ, दोन तिकीट है क्या? जरा कॉर्नर की देना" आमिरच तो, तो म्हणतो " है ना एक ये कॉर्नर और एक दूसरी कॉर्नर की" संपूर्ण थिएटर या वाक्याला टाळ्या आणि हशाच्या गजरात दुमदुमून जायचं. बाल्कनी, स्टॉल,अप्पर स्टॉल, ड्रेस सर्कल अशा विविध terminologyची भर आमच्या सामान्य ज्ञानात पडली ती ह्या थिएटर्समुळेच. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मित्र-मैत्रिणी नातेवाईकां प्रमाणेच एक अविभाज्य घटक म्हणजे पिक्चरचे थिएटर. आपल्याकडे जशी विविध देवांची मंदिरा प्रसिद्ध आहेत जशी दगडूशेठचा गणपती, तांबडी जोगेश्वरी तशीच ही विविध थिएटर्स मनोरंजनाची मंदिरच होती. होती म्हणायचं कारण आता मनोरंजन प्रत्येकाच्या हातात सामावला आहे.   बालाजी, शिर्डी, पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी भाविक रात्र-रात्रभर रांगा लावून थांबायचे. अहोरात्र थांबून देवदर्शन घेतल्यावर त्यांच्या च...

लुप्त

  लुप्त आज सकाळी मुली बरोबर भाजी घ्यायला बाहेर पडलो होतो. अचानक रस्त्याच्या बाजूला दोन बायका कोळशावर कल्हई लावताना पाहिल्या. चार पावलं पुढे गेल्यावर मनात आलं आपण समाजातील कलहं कायमच बघतो, कल्हई क्वचितच बघायला मिळते. आपल्या मुलांना कल्हई म्हणजे काय ते पण कळायला हवं.  मग काय तसाच मागे फिरलो आणि त्या दोघेजणींशी कल्हई करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढत छान गप्पा मारल्या. दोघांपैकी एक जण साधारण चाळीशीतली तर एक अगदीच म्हातारी आजी. म्हातारीचा उत्साह तेवढाच दांडगा होता (ज्या उत्साहाने तीने केसांना मेंदी लावलेली होती 😀). मी तीलाच विचारायला सुरुवात केली की तुम्ही कधीपासून करताय वगैरे वगैरे.  मग काय आजीबाईचा चेहरा खुलला आणि सांगू लागली. "दादा पूर्वी लोकं घराघरातून चार पाच पातेली-भांडी घेऊन यायची. रोजचा धंदा होता आमचा. आता मात्र तसं नाहीये. चार-पाचच गिऱ्हाईकं मिळतात, ती सुद्धा रोजची नाही. आली तरी एखाद दुसरे पातेलं-भांडं आणतात."  "काय करायचं बोला! सामान बी महाग झालंय.   कास्टिक सोडा, नवसागर, कोळसा अन् कथिल धातूची पट्टी. सगळ्याची किंमत वाढलीय बघा. आम्हाला पन पूर्वीसारखं परव...