Skip to main content

Posts

शिर्षक मुद्दामच शेवटी लिहलयं... वाचतांना तुम्हाला सुचतयं का बघा.. आणि सांगा.               जाग आली अन् बघते तर काय सहा वाजून गेलेले. पटापट आवराआवरी केली आणि किचनमध्ये आले.  चहा टाकला पटकन. बाहेरचं वातावरण बघून कळतच नव्हतं सकाळ झाली का संध्याकाळ. सध्या रात्र काय दिवस काय आणि पहाट काय आणि संध्याकाळ काय. सगळं सारखंच वाटतंय कारण पक्षी दोन्ही वेळेस ओरडतात आणि कुत्री कायमची भुंकणं बंद झाली आहेत.  जरा शुद्धीवर आल्यासारखी झाल्यावर कळले की संध्याकाळ झाली आहे. दुपारचे जेवण झाल्यावर ओटा आवरला. नंतर त्या व्हाट्सअप फेसबुक बघण्याच्या नादात कधी डोळा लागला कळलेच नाही. सध्या रोजच रविवार. भरगच्च नाश्ता तोसुद्धा वैविध्यपूर्ण आणि दुपारचं जेवण उशिरा तेसुद्धा चारीठाव.  दुसरा उद्योगच नाही. मग काय "पन्नास रुपये अनलिमिटेड थाळी" च्या पाटी सारखी मेस झालंय आमचं किचन. ह्यांना चहा दिला. ह्यांना म्हणजे एरवी सुहासला मी अरे-तुरेच करते पण तुमच्या समोर म्हणून ह्ययांना बरं का.  तर सुहासला चहा दिला आणि बेडरूममध्ये अदिती खेळत होती एकटीच. अर्थातच एकटी नव्हती तिचा...
खिचडी.. नेहमीप्रमाणे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो कुलूप उघडले. सैक टाकली आणि टीव्ही लावला, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड क्रिकेट मैच चालू होती. पाटीवरचा निरोप वाचला "खिचडी केली आहे, गरम करून घ्या छान". संध्याकाळचे साधारण सात साडेसात वाजलेले, मनात म्हटलं छान आटपू आणि गरमागरम डाळ तांदूळ खिचडी दूध-तूप घालून, बाजूला लिंबाचं लोणचं टॉक्, जमलं तर एखादा पापड भाजू गैसवर... मस्त फ्रेश झालो आणि ओट्यापाशी आलो. पातेल्याचे झाकण उघडलं आणि बघतो तर काय? च्यायला.. दूध खिचडीला विरजण लागलं ना. खिचडी म्हणजे साबूदाण्याची खिचडी केली होती. फुल पोपट झाला. मग लक्षात आलं अरे हा! आज संकष्टी चतुर्थी होती ना... म्हणून सकाळचा उरलेल्या साबुदाणा बाईसाहेबांनी "तुम्हाला आवडते ना" या नावाखाली (सरकवलेला) शिजवलेला दिसतोय. 'छान' 'सुंदर' 'अय्या किती गोड' असे शब्द हिने वापरले ना! की का कुणास ठाऊक उगाच मनात शंका चुकचुकतेच. आत्ता ही तसचं झालं "गरम करून घ्या छान" कसं आहे बघा, काही पदार्थ हे ज्या त्या वेळीच खाण्यात जी मजा आणि रंगत येते ना, ती इतर वेळी नाही. साबुदाणा खिचडी म्हणज...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...
पत्र प्रपंच.... उत्तरार्ध वडिलांचे मुलाला आलेलं पत्र सादर करतोय..                     ।।श्री गजानन।। बोरीवली, मुंबई             १७/०७/२०१९ प्रिय चिरंजीव..   बघ ना सुरुवात करतानाच आशीर्वाद चिरंजीव. मुलांच्या बाबतीत आई-वडिलांच्या विचारांची सुरुवातच अशी होते चिरायु चिरंजीव वगैरे. तुझे पत्र वाचतांना सतत आठवत होते ते 'आप्पा' माझे वडील, तुझे आजोबा. त्यांच्या पत्रांतपण असाच एक वैचारिक ओलावा असायचा. वाई सारख्या छोट्या गावातून मी मोठ्या शहरात आलो. शिक्षण पूर्ण केले, नोकरीला लागलो. परंतु या सर्व प्रवासात पत्र लिहिली ती फक्त ख्यालीखुशालीचीच. तीसुद्धा क्वचितच वर्षातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा खास माझ्या आईच्या प्रेमापोटी. आज तुझ्या पत्रामुळे बऱ्याच वर्षांनी तो योग परत जुळून आला. पेन हातात धरलं आणि मन पेनाच्या बॉलच्याटीप पासून ते रीफिलच्या शाई संपते तिथपर्यंत मागे गेलं.  विचार आला की इतकं काही आहे की शाई नक्कीच संपेल. अर्थात मी काही एवढे लिहिणार नाहीये काळजी करू नकोस. आता गेल्या काही वर्षात ...
पत्रास कारण की... आज पत्र लिहितोय. कदाचित शाळा-कॉलेज सोडल्यानंतर पत्र आणि पत्रलेखन विसरलो होतो. इंटरनेट ई-मेल Facebook, Facetime, व्हाट्सअप यांच्या भाऊगर्दीत एकमेकांशी बोलणं होतं पण संवाद होतोच असं नाही. मला अजूनही आठवतंय लहानपणी पोस्टकार्ड किंवा इनलैड  लेटरची आपल्याकडे मामा मावशी आत्या यांची पत्र यायची. ती वाचली जायची नंतर कित्येक दिवस ती जपून ठेवलेली असायची. मग कधी जुन्या कपाटाच्या खाली जेव्हा केर काढले जायचे तेव्हा ती पत्र भसकन बाहेर यायची मागे मागे टाकलेली. आपल्या आवडीची पत्र मग परत परत वाचली जायची. आजी किंवा आई वाचायची. कधी चांगल्या-वाईट कटू प्रसंग आठवून रडायची मग तिला पाहून मलापण उगाच रडू यायचं. खरं सांगू का गंमत होती त्यात, नातं जपणं म्हणजे काय हे मला त्या पत्रांनी नकळत शिकवलं. हल्लीच्या व्हाट्सअप Clear चॅट सारखं नव्हे.  मला नेहमीच महाराष्ट्र टाइम्सची टॅगलाईन "पत्र नव्हे मित्र"  समर्पक वाटते. खरंच ते पत्र जिवाभावाचा मित्र होता जणू. त्याच्यापाशी दोन्ही बाजूंची माणसं अतिशय मोकळेपणाने व्यक्त होत होती आणि तो मित्र म्हणजे पत्र हा इतका बेमालूम पणे त्यां दोन बाजूंना, जी...
युरोप एक नशा.. माधुरी, मधुबाला जश्या इव्हीनींग पार्टीला सुंदर दिसतात आणि सकाळी उठल्यावर ब्रश न करता हातांचे आळोखेपिळोखे देत जांभई साठी उघडलेल्या आ..मध्येसुध्दा अगदी तेवढ्याच लाजवाब दिसतात,असंच काहीसं सौंदर्य युरोपमध्ये आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जॉय मुखर्जी आणि शम्मी कपूरने दाखवलेल्या युरोप पेक्षा नव्वदच्या दशकानंतर यश चोप्रांनी दाखवलेला सिलसिला पासून ते पार अगदी दिल तो पागल हे मधला युरोप हा फारच वेगळा होता.  सत्तर-ऐंशीच्या दशकात पहिलेला युरोप बर्‍यापैकी ब्लॅक अँड व्हाईट आणि इस्टमन कलरचा होता. तर यश चोप्रांनी दाखवलेला हा Digital रंगीबेरंगी आणि Countrysideचा होता त्यामुळे आपण त्याच्या जास्त प्रेमात पडत गेलो.  युरोपमध्ये विमानात उतरल्यापासून एक जो वेगळ्याच प्रकारचा गंध,वास येतो. जणू काही आपण त्या गंधाच्या प्रेमात पडतो. मग जेव्हा वेगवेगळ्या रस्त्यांवर,  डोंगरांवर आणि आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्यात युरोप दिसायला लागतो तेव्हा तर आपले भानच हरपून जाते.  कितीहीवेळा त्याच जर्मनीमध्ये, त्याच लंडनमध्ये किंवा त्याच फ्रान्समध्ये आपण गेलो तरी प्रत्येक वेळेस युरोपमध्ये ...
सत्ते पे सत्ता (सत्त्यातर) अमिताबच्चन..जी सहस्त्रचंद्र दर्शनाच्या दिशेने वाटचालीसाठी शुभेच्छा... जीवनातील पहिली दोन सोडली तर तब्बल पाच दशकं आपल्या अस्तित्वानं संपूर्ण भारताला आणि जगाला सुध्दा मंत्रमुग्ध करणारं व्यक्तीमत्व. तुमच्यावर लेख पुस्तक आणि बरंच काही लिहलं गेलयं, अजुनही लिहलं जातयं.  मोठ्या मोठ्या नामांकित व्यक्ती पासून ते अगदी कोपर्यावरचा बुट पॉलिशवालासुद्धा (त्याला पण तुम्ही स्वाभिमानीपणाची ओळ देउन अजरामर केलंत म्हणून)  लिहू शकतो. इतके आम्ही एकशे तीस करोड भारतीय अमिताबच्चनमय आहोत. म्हणूनच मीपण मांडतोय आज. चाळीशी, पन्नाशी-साठीतले तर नक्कीच बच्चन बच्चन करतील पण अजूनही कौन बनेगा करोडपती बघतांना, तुमचं अस्तित्व इतकं भारावून टाकणारं आहे की अवघं पन्नास-साठ महीने वयाची पोरं टोरं पण बच्चन बच्चन करतात..काय ही जादू.. हे बघितल्यावर पटतं.."रीश्ते मे तो आप सब के बाप होते है...नाम है शहेनशहा" अभिनेत्याच्या जीवनातील प्रत्येक चढ उतार आम्ही तुमच्याकडे पहात पहातच अनुभवलेत. जे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या सुद्धा आयुष्यात येतात. अचानक झालेला मोठा अपघात, वैवाहिक जीवनातील गैरसमज,...