Skip to main content

Posts

पत्रास कारण की... आज पत्र लिहितोय. कदाचित शाळा-कॉलेज सोडल्यानंतर पत्र आणि पत्रलेखन विसरलो होतो. इंटरनेट ई-मेल Facebook, Facetime, व्हाट्सअप यांच्या भाऊगर्दीत एकमेकांशी बोलणं होतं पण संवाद होतोच असं नाही. मला अजूनही आठवतंय लहानपणी पोस्टकार्ड किंवा इनलैड  लेटरची आपल्याकडे मामा मावशी आत्या यांची पत्र यायची. ती वाचली जायची नंतर कित्येक दिवस ती जपून ठेवलेली असायची. मग कधी जुन्या कपाटाच्या खाली जेव्हा केर काढले जायचे तेव्हा ती पत्र भसकन बाहेर यायची मागे मागे टाकलेली. आपल्या आवडीची पत्र मग परत परत वाचली जायची. आजी किंवा आई वाचायची. कधी चांगल्या-वाईट कटू प्रसंग आठवून रडायची मग तिला पाहून मलापण उगाच रडू यायचं. खरं सांगू का गंमत होती त्यात, नातं जपणं म्हणजे काय हे मला त्या पत्रांनी नकळत शिकवलं. हल्लीच्या व्हाट्सअप Clear चॅट सारखं नव्हे.  मला नेहमीच महाराष्ट्र टाइम्सची टॅगलाईन "पत्र नव्हे मित्र"  समर्पक वाटते. खरंच ते पत्र जिवाभावाचा मित्र होता जणू. त्याच्यापाशी दोन्ही बाजूंची माणसं अतिशय मोकळेपणाने व्यक्त होत होती आणि तो मित्र म्हणजे पत्र हा इतका बेमालूम पणे त्यां दोन बाजूंना, जी...
युरोप एक नशा.. माधुरी, मधुबाला जश्या इव्हीनींग पार्टीला सुंदर दिसतात आणि सकाळी उठल्यावर ब्रश न करता हातांचे आळोखेपिळोखे देत जांभई साठी उघडलेल्या आ..मध्येसुध्दा अगदी तेवढ्याच लाजवाब दिसतात,असंच काहीसं सौंदर्य युरोपमध्ये आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात जॉय मुखर्जी आणि शम्मी कपूरने दाखवलेल्या युरोप पेक्षा नव्वदच्या दशकानंतर यश चोप्रांनी दाखवलेला सिलसिला पासून ते पार अगदी दिल तो पागल हे मधला युरोप हा फारच वेगळा होता.  सत्तर-ऐंशीच्या दशकात पहिलेला युरोप बर्‍यापैकी ब्लॅक अँड व्हाईट आणि इस्टमन कलरचा होता. तर यश चोप्रांनी दाखवलेला हा Digital रंगीबेरंगी आणि Countrysideचा होता त्यामुळे आपण त्याच्या जास्त प्रेमात पडत गेलो.  युरोपमध्ये विमानात उतरल्यापासून एक जो वेगळ्याच प्रकारचा गंध,वास येतो. जणू काही आपण त्या गंधाच्या प्रेमात पडतो. मग जेव्हा वेगवेगळ्या रस्त्यांवर,  डोंगरांवर आणि आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्यात युरोप दिसायला लागतो तेव्हा तर आपले भानच हरपून जाते.  कितीहीवेळा त्याच जर्मनीमध्ये, त्याच लंडनमध्ये किंवा त्याच फ्रान्समध्ये आपण गेलो तरी प्रत्येक वेळेस युरोपमध्ये ...
सत्ते पे सत्ता (सत्त्यातर) अमिताबच्चन..जी सहस्त्रचंद्र दर्शनाच्या दिशेने वाटचालीसाठी शुभेच्छा... जीवनातील पहिली दोन सोडली तर तब्बल पाच दशकं आपल्या अस्तित्वानं संपूर्ण भारताला आणि जगाला सुध्दा मंत्रमुग्ध करणारं व्यक्तीमत्व. तुमच्यावर लेख पुस्तक आणि बरंच काही लिहलं गेलयं, अजुनही लिहलं जातयं.  मोठ्या मोठ्या नामांकित व्यक्ती पासून ते अगदी कोपर्यावरचा बुट पॉलिशवालासुद्धा (त्याला पण तुम्ही स्वाभिमानीपणाची ओळ देउन अजरामर केलंत म्हणून)  लिहू शकतो. इतके आम्ही एकशे तीस करोड भारतीय अमिताबच्चनमय आहोत. म्हणूनच मीपण मांडतोय आज. चाळीशी, पन्नाशी-साठीतले तर नक्कीच बच्चन बच्चन करतील पण अजूनही कौन बनेगा करोडपती बघतांना, तुमचं अस्तित्व इतकं भारावून टाकणारं आहे की अवघं पन्नास-साठ महीने वयाची पोरं टोरं पण बच्चन बच्चन करतात..काय ही जादू.. हे बघितल्यावर पटतं.."रीश्ते मे तो आप सब के बाप होते है...नाम है शहेनशहा" अभिनेत्याच्या जीवनातील प्रत्येक चढ उतार आम्ही तुमच्याकडे पहात पहातच अनुभवलेत. जे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या सुद्धा आयुष्यात येतात. अचानक झालेला मोठा अपघात, वैवाहिक जीवनातील गैरसमज,...

टॉनिक

टॉनिक शैलाताई हॉलमध्ये निवांत बसल्या होत्या.  एकटक खिडकी कडे बघत.  तेवढ्यात बेल वाजली. "अगोबाई आता काय करावे, हया गुडघ्यांनी ऊत आणलाय मेला. काय मध्येच दुखायला लागतात"  थोड्या उठल्या आणि परत बसल्या. "नेहा.. जरा बघ, दार उघड. अमितच आला असेल वाजले साडेसात कारण." अमितने बूट काढतानाच पहिला प्रश्न जरा अधिकारनंच विचारल्यासारखा "आई! काय गं बरी आहेस ना? गेली नव्हतीस ना संध्याकाळी चक्कर मारायला आणि मग त्या तुमच्या कट्ट्यावर?"  "नाही रे बाबा नव्हते गेले कुठेही. विचार नेहाला हवंतर. ती तर पाचलाच आलीय आज." शैलाजाताईंची पुटपुट सुरु झाली "काय मेलं, मला गेले एक-दीड आठवडा घरी बसून ठेवला आहे. काय धाड भरलीय." असं म्हणत उठून कोचावर बसल्या आणि झी मराठी चालू केलं सिरीयलचा रतीब टाकायला. किचनमध्ये चहा घेताना नेहा म्हणाली "अमित, काय रे बघ ना दोन आठवडे झाले आईंची तब्येत काही सुधारत नाही. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे गोळ्या, औषध, सकाळचे स्पेसिफिक ब्रेकफास्ट घरगुती व्यायाम चालू आहे पण..." "हो ना अगं,  काय झालंय कळतच नाही पहिल्यासारखी फ्रेश...
मित्र, मैत्री... मैतर सीन वन..ॲक्शन "ए मिल्या".."मिल्या$$".. सोसायटीच्या पार्किंगमधून कोणीतरी हाका मारत होतं. अचानक जाग आली आणि पाहतो घड्याळ्यात तर रात्रीचा एक वाजला होता. मी नेहमीप्रमाणे हॉलमध्येच टीव्ही पाहत झोपलो होतो आणि झोप कधी लागली कळलंच नाही. As usual टीव्ही चालूच होता. जरा दोन मिनिट वाटलं भास होतायत. पण परत "मिल्या$$"..अशी हाक ऐकू आली. हा तर संदीपचा आवाज वाटतोय. लक्षात आल्यावर पटकन दार उघडलं आणि खाली पार्किंग मध्ये बघितलं तर संदीपच हाका मारत होता.  "मिल्या लेका पटकन खाली ये. सुहासच्या वडिलांना मेजर अटेक आलाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलय." मी पण घाबरून "काय सांगतोस". आत आलो आईला उठवलं निरोप दिला.  जसा होतो तसं हाफ पॅंटवर जर्किन चढवलं आणि निघालो. रात्रीचे साधारण दीड वाजले असतील. मी आणि संदीप डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पाचव्या मजल्यावर.  काकांना आयसीयु मध्ये ठेवलेलं होतं. बाहेर सुहासची आई, भाऊ आणि इतर नातेवाईक होतेच. सुहासला भेटलो तर तो as usual स्टेबल होता. "कंडिशन थोडी critical आहे असं डॉक्टर म्हणतायत" एवढंच बोलला.  ब...
 "बाहुबली" तसा मी सध्याच्या क्रिकेटचा चाहता नाही प्रत्येक मॅच बॉल टु बोल बघणारा अगदी इंडिया ची मैच असली तरी. सगळी रेकॉर्ड लक्षात ठेवणारा आणि चार मित्रमंडळी किंवा नातेवाईका समोर आपण जणू कसे हर्षा भोगले आहोत अशा अविर्भावात ती रेकॉर्ड फेकणारा.  सचिन-राहुल-सौरव नंतर हळूहळू क्रिकेट बघणे कमी झालंय किंवा इंटरेस्ट कमी झाला म्हणा. आयपीएल सारख्या तद्दन मनोरंजनमय क्रिकेटमुळे तर जणू संपलाच आहे. संध्याकाळी घरी आल्यावर "Snacks आणि Cold Drinks" किंवा चहा-कॉफीचे स्मॉल लार्ज पेग पीत वर्षाला शेकडा मैचेस बघायची अशी आवडच राहिलेली नाही. तरीही सध्याच्या भारतीय क्रिकेट जगतात जी काही एका हाताच्याच बोटावर मोजावीत अशी नावं घ्यावी (किंवा नाव ठेवू नयेत) असे मला वाटणारे खेळाडू म्हणजे रोहित, बुमराह, राहणे, थोड्याफार प्रमाणात विराट आणि बाहुबली महेंद्रसिंग धोनी. खरंच भारतीय क्रिकेटमधला तो बाहुबलीच आहे. बाहुबली सिनेमा तो महेंद्र (प्रभास) जसा एका हातात कित्येक किलो वजनाची शंकराची पिंड लीलया उचलतो, अगदी तो फोटो तो शॉट मॉर्फ  करूनच डोळ्यासमोर येतो तो...धोनीने भारतीय क्रिकेट संघाचा पिंड रुपी कैल...
 नेतृत्व की विचारधारा..... 2019 चा निकाल 2014 पेक्षाही सर्वार्थाने मोठा ऐतिहासिक, धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा आहे. 201४ ची परिस्थिती वेगळी होती सलग दहा वर्ष एक पक्ष इतर पक्षांना घेऊन एकसुरी राज्य करत होता. राष्ट्रीय आणि प्रादेशिक दोन्ही पातळीवरील विविध पक्षांना बदल हवा होता. त्या बदलाच्या मानसिकतेचा परमोच्च बिंदू गाठला आणि नरेंद्र मोदी नामक एक नेतृत्व उदयास आले. जागतिक इतिहासात जेव्हा जेव्हा जनमानसात एक देशाच्या सरकार अथवा नेतृत्वाबद्दल एक विरोधाची भावना तीव्र होत जाते तेव्हा कधीतरी एक असा परमोच्च क्षण येतो आणि सरकार अथवा नेतृत्व इतक्या मोठ्या प्रमाणात पराभूत होते की त्याची इतिहासात नोंद होत जाते . त्याच मुळे 2014 हे लोकांनी मतपेटीतून उलथवलेले आणि ज्याचा फायदा एका नेतृत्वाने योग्य पद्धतीने घेतला असे हे सरकार होते.  भारताच्या स्वातंत्र्यानंतर च्या इतिहासात मधील काही अपवाद वगळता एकाच पक्षाचे एकाच विचारधारेचे सरकार राज्य करीत होते अगदी २०१४  सालापर्यंत. दोन विविध  विचारधारांचे पक्ष राष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी लढत होते. आपण नेहमीच म्हणतो की विचारधारा ही जिंक...