Skip to main content
मित्र, मैत्री... मैतर

सीन वन..ॲक्शन
"ए मिल्या".."मिल्या$$".. सोसायटीच्या पार्किंगमधून कोणीतरी हाका मारत होतं. अचानक जाग आली आणि पाहतो घड्याळ्यात तर रात्रीचा एक वाजला होता. मी नेहमीप्रमाणे हॉलमध्येच टीव्ही पाहत झोपलो होतो आणि झोप कधी लागली कळलंच नाही. As usual टीव्ही चालूच होता. जरा दोन मिनिट वाटलं भास होतायत. पण परत "मिल्या$$"..अशी हाक ऐकू आली. हा तर संदीपचा आवाज वाटतोय. लक्षात आल्यावर पटकन दार उघडलं आणि खाली पार्किंग मध्ये बघितलं तर संदीपच हाका मारत होता.  "मिल्या लेका पटकन खाली ये. सुहासच्या वडिलांना मेजर अटेक आलाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलय." मी पण घाबरून "काय सांगतोस". आत आलो आईला उठवलं निरोप दिला.  जसा होतो तसं हाफ पॅंटवर जर्किन चढवलं आणि निघालो. रात्रीचे साधारण दीड वाजले असतील. मी आणि संदीप डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये पाचव्या मजल्यावर.  काकांना आयसीयु मध्ये ठेवलेलं होतं. बाहेर सुहासची आई, भाऊ आणि इतर नातेवाईक होतेच. सुहासला भेटलो तर तो as usual स्टेबल होता. "कंडिशन थोडी critical आहे असं डॉक्टर म्हणतायत" एवढंच बोलला.  बघता बघता तीन वाजेपर्यंत आमचं आख्ख कॉलेजच हॉस्पिटल पाशी आवारात जमा झालं होतं. सुहास दळवी च्या वडीलांना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय ही बातमी रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत सगळ्या सेकंड ईयर इंजिनीअरिंगला कळाली होती. सर्व फॅकल्टी चे मिळून शे-दोनशे कॉलेजीयन्स पब्लिक हॉस्पिटल पाशी जमा झालो होतो.  प्रत्येक जण आपापल्या परिने विचारपूस आणि आपल्याकडून काय जास्तीत जास्त मदत होईल याचा प्रयत्न करत होतं. कित्येक जणांनी तर आपल्या काकाची मामाची कुठलीतरी डॉक्टरांची ओळख काढली होती. सुहास दळवी हा आमच्या कॉलेजमधला जगन्मित्र होता. कॉलेजमधल्या एकही विद्यार्थी असा नसेल की ज्याला सुहास दळवी आणि सुहासला तो माहित नसेल.  साधारण चार साडेचारच्या सुमारास परिस्थिती सगळी नॉर्मल आहे हे कळल्यावर सुहासच्या आईला जरा बरं वाटलं आणि कॉफी प्यायला म्हणून ती खाली उतरली. हॉस्पिटलच्या आवारात जमलेली गर्दी बघुन तिच्या डोळ्यातून पुन्हा घळाघळा पाणी ओघळू लागलं. मला आणि संदीप ला म्हणाली "हीच खरी मैत्री, सुहास खरंच भाग्यवान आहे आणि तुम्ही सुध्दा".. सगळं आठवलं की अजूनही वाटतं की आपण किती भाग्यवान असतो की असे मित्र आपल्याला मिळतात आपल्या बरोबर असतात.
कट....
सीन टू...ॲक्शन
पराग ऑफिसमधून घरी आला.. "अथर्व, काय करतोयस?"  "बाबा, परवा सोमवारी क्लासची प्रेलिम आहे , पहिला पेपरचा अभ्यास करतोय". परागनी हिला विचारलं "कधीपासून करतोय गं हा?"  "दुपारी तीनला बसलाय. सात वाजलेत झाले की चार तास अहो."
परागनी पटापट फ्रेश होऊन आवरलं आणि तिला म्हणाला "अगं ऐकलस का? मी आणि अथर्व बाहेर चाललोय बाकीचे सगळे डिटेल्स व्हाट्सअप वर टाकतो"
"चला अथ्या, लवकर आटप, बाहेर जायचयं आपल्याला, ये खाली आवरुन." अथर्व गडबडलाच, काही कळेनाच त्याला. "बाबा, आता कुठे"
"तू चल रे फक्त"
पराग नी गाडी काढली आणि डायरेक्ट पीव्हीआर सिनेमा च्या पार्किंग मध्येच टाकली. दोघे वर गेले Avengers Part 2 ची  तिकीट काढली आणि डायरेक्ट recliner chair मधेच. अथर्वला काही कळतच नव्हतं त्याला एकीकडे खूप आनंद होत होता आणि मनात भीती पण वाटत होती कि नक्की चाललंय काय. अथर्व आनंदाने म्हणाला "बाबा तू खरंच भारी आहेस. I was waiting to see this movie from last two weeks,  पण काय करू बोललो नाही रे. दहावीचं वर्ष आहे ना!"
पराग म्हणाला "मला माहितीये रे हिरो. हे असंच असतं काही प्रमाणात माझं पण असंच होतं. आत्ता Avenger असेल तेव्हा "दिल तो पागल है"  होता एवढेच."
   मस्त पिक्चर बघून कोल्ड्रिंग पॉपकॉन नाचोज  खाऊन बाहेर पडले दोघं. वाटेत मस्त गाडीवरची अंडा बुर्जी खाल्ली मनसोक्त. अथर्व एवढा खुश होता की त्याला काय बोलू आणि काय नाही कळतच नव्हतं. "बाबा, रियल थँक्यू काय सांगू. I don't have single word to express. रोज क्लासेस, मग टेबल टेनिस, डेली स्कूल या सगळ्याचा इतका कंटाळा आला होता ना. साले आमचे बरेच मित्र पण फुल टु अभ्यासात दिवस- रात्र ९२ चे ९५ करण्यासाठी. मला नाही रे एक दोन टक्के साठी एवढी मारामारी करायची. पण तुला माहिती आहे की मला हे सगळं समजतं आणि मलाही कळतंय की फ्युचर प्रोस्पेक्ट ऍडमिशन जॉब या सगळ्यासाठी करावे लागणार आहे. मी माझ्यापरीने प्रयत्न करतोय आणि नक्की करूनच दाखवेन. "पण खरं सांगू, आज तू जे काय केलयंस ना बाबा,  ते मी कधीच जन्मभर विसरू शकणार नाही. I will never forget. Its like dream man. अवेंजर सारखा मूव्ही तुझ्याबरोबर शेजारी बसून आणि त्याच्यावर icing on the cake म्हणजे रात्री अकरा वाजता गाडीवरची अंडा भुर्जी तीसुद्धा तुझ्याबरोबर. यू आर सिम्पली ग्रेट Man. You are my real friend first and forever. Thank you very much"
आपल्या मुलाचं हे सगळं ऐकल्यावर आपल्या पायातल्या जोड्यां बरोबर विचारांची जोड सुद्धा मुलात येत आहे हे पाहून फार भारी वाटलं परागला. अथर्व सगळे बोलत होता तेव्हा परागच्या डोळ्यांच्या पडद्यामागे पाणी येऊन धडका मारत होतं पण त्यांनी पूर येऊन दिला नाही....
कट....
सीन थ्री... अक्शन
   "आबा, हा घ्या चहा. आज थोडी साखर घातलीय मी त्याच्यात. काल तुम्ही आमरस न खाता कंट्रोल दाखवलात ना म्हणून टोकन ऑफ अॅप्रिसिएशन. अहो आबा, आमच्या ऑफिसमध्ये किंवा या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हल्ली आम्हाला आमच्या टीम मेंबर्सना असंच प्रत्येक छोट्या-मोठ्या चांगल्या केलेल्या गोष्टीसाठी किंवा सक्सेस स्टोरी साठी टोकन ऑफ अॅप्रिसिएशन द्यावा लागतं.  ते दिलं तरच आमच्या सारख्या मॅनेजरची नोकरी टिकते अगदी तसेच."
आबा हसले "वा.. छान फक्कड झालाय. कित्येक दिवसांनी साखरेचा चहा. तुला सांगतो शिल्पा एकेकाळी मी फुल चार चमचे घालून चहा प्यायचो. घरी, ऑफिसमध्ये, मित्रांच्या कट्ट्यावर. इतका की मला पाकातला गुलाबजाम म्हणायचे सगळे. हिला आवडायचं नाही कारण तो गोड मीठा चहा आणि हातातली सिगरेट या दोन्ही तिच्या सवती होत्या जणू."
"आबा मला माहितीय थोडेफार. आई सांगायच्या कधीकधी."
"हो ना, बघ ना अगं. आता वाटतं तेव्हा थोडा कंट्रोल केला असता तर आज कदाचित चित्र काही वेगळं असतं..असो. आज काय मेनु रविवारचा"
"काही विशेष नाही, पण आबा युट्युब वर पाहिलंय काल कोंबडी वडे. ते करून पाहणारे आज"
अचानक आबा तंद्रीत गेले डोळ्यात थोडसं पाणी.
शिल्पाने विचारलं "काय झालं"
"शिल्पा तुझ्या आणि माझ्यात साधारण चाळीस एक वर्षांचे अंतर आहे. तू इतकं सगळं प्रेमानी करतेस मला काय हवं नको ते बघतेस. तुझ्याशी मी सगळ्या गोष्टी मन मोकळेपणाने बोलतो. एक वेगळं कनेक्ट आहे आपल्यात. प्रत्येक सून आणि सासरा यात असेलच असं नाही पण आपल्या तो आहे.  बघ ना माझं सगळं आयुष्य दररोज बोलताना, गप्पा मारताना तुझ्या समोर मांडत असतो. प्रत्येक कानाकोपऱ्यातला प्रसंग उलगडत असतो मी तुझ्या समोर. मी आणि शैलजा कधी अन कसे भेटलो पासून ते अगदी तुझा नवरा सौरभ होईपर्यंत. त्यानंतरच आमचं सहजीवन, सुखदुःख, कष्टी-आनंदी दिवस. सगळे काय काय सांगतो तुला.  परवा तर तुला माझं कॉलेजमधलं वाहीदा बरोबर असलेले प्रेम प्रकरण सुद्धा आता माहिती झालं.  इतकं मोकळं वाटतं ना!"
"कसं असतं शिल्पा, आयुष्याच्या पूर्वसंध्येला माणसाला जायच्या आधी आपली सगळी गाठोडी कोणाच्याकडे तरी सुपूर्त करून जायची इच्छा असते. कारण ही गाठोडी आपण गेल्यानंतर आपल्यानंतर कोणीतरी सोडवेल. त्यातल्या विविध अनुभव गोष्टींची मजा घेईल आणि आपल्या आठवणी चिरकाल राहतील ही कुठेतरी एक भावना असते.
आई-वडील, नातेवाईक, मग बायको मुलं लहानपणापासून मोठेपणी पर्यंतचे विविध मित्रमंडळी हे सगळे कायम असतात जवळ. पण जेव्हा एखादं एकदम तिऱ्हाईत कोणीतरी जीवनात येतं. आपले विचार त्याच्याशी पटतात आपली मतं जुळतात. मग आपण त्याच्याशी व्यक्त-अव्यक्त होत जातो. तो रंगीत गॅसचा फुगा जसा बेफिकीर उंच उंच हवेत उडत जातो ना तसं हलका व्हायला होतं. कारण त्याला माहित असतं की मी काही काळानंतर फुटणार आहे पण त्या हलकेपणाचा आनंद काही औरच असतो." 
"तू सौरभशी लग्न करून जेव्हा या घरात आलीस आणि जणू मला नवीन मैत्रीणच मिळाली.  जीच्यापाशी माझ्या भूत-वर्तमान आणि भविष्याची वही कोरी होती. तु जजमेंटल नव्हतीस आणि माझ्याबद्दल मतं नव्हती. त्यामुळे मला माझा आयुष्य जसंच्या तसं काहीही न लपवता मांडणं , खरं-खोटं सांगणं सोपं गेलं. आज त्यामुळे मी त्या फुग्यासारखा हलकेपणाचा आनंद घेतोय.Thank you Shilpa, My Friend Thank you. I am so lucky."
हे सगळं ऐकून शिल्पाच्या डोळ्यात पाणी तर आलेच पण एक विचार चमकून गेला की आपल्याला पण आपल्या पूर्वसंध्येला क्षितीजावर मिळेल का असं कोणी जो त्या आनंद पिक्चर मधल्या राजेश खन्ना सारखा रंगबिरंगी फुगे हातात घेऊन दिलखुलास गाणं म्हणत असेल जिंदगी कैसी ये पहेली....
कट....
हे असे विविध प्रसंग पाहिले वाचले अनुभवले की वाटतं
"मित्र, मैत्री हि एक भावना आहे..नातं नाही. प्रत्येक नात्यात एक 'मैतर' लपलेला असतो. तो आपला आपणच शोधायचा असतो..."
©मिलिंद सहस्त्रबुद्धे
०४/०8/२०१९

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय मधेच उभे आ
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी