Skip to main content

Posts

"आहे मनोहर तरी"

"आहे मनोहर तरी" काही बातम्या आज नाहीतर उद्या येणारच हे माहिती असतं. तरी ती बातमी ऐकण्याची मनस्थिती कधीच तयार होत नाही. ती बातमी आल्यावर सुद्धा नाही. अशीच काहीशी ब्रेकिंग न्यूज संध्याकाळी हार्ट ब्रेकिंग करून गेली. परिकर गेले. जाणारच होते, असाध्य रोगाशी झुंज देत होते. त्या रोगाशी झुंज बरेच जण देतात त्यात यशस्वी होतात पुन्हा झुंज देतात पुन्हा यशस्वी होतील याची खात्री मात्र नसते. तसेच काहीसे पर्रीकर यांच्या बाबतीत झालं.  हा माणूसच वेगळ्या हाडांचा आणि धातूचा बनलेला होता. स्वतः मेटलर्जी मध्ये मास्टर्स असल्यामुळे विविध धातूंप्रमाणे हार्डनेस आणि स्टिफनेस या माणसाच्या रक्तातच होता.  लोखंडाच्या मेल्टिंग पॉइंट प्रमाणे तो त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत शेवटपर्यंत लढत राहिला. काम करत राहिला, देशसेवा करत राहिला. समाज सुधारक म्हणून नाही तर एक राजकारणी मुख्यमंत्री म्हणून. फार अवघड आणि अजब रसायन होतं हे.   देशभर लोकं पर्रीकरांना ओळखू लागले ते फक्त संरक्षण मंत्री झाल्यामुळे नाही. तसे बरेच संरक्षण मंत्री झालेत ज्यांना भारतीय जनता "चांगलीच ओळखून" आहे.  तर पर्रीकरांना ओळखू लागले ते एवढ...

"ती" चा प्रवास

"ती" चा प्रवास स्वतःच्या स्वतःला जन्म देते आणि पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेते. तर इतरांना जन्म देण्याची क्षमता असलेली ऐकमेव अशी ही स्री. जन्मापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास वेगवेगळ्या वळणांवर नवीन नवीन जन्म घेतो. जसा साप कात टाकून परत परत अमर राहतो अगदी तसाच. जन्माला येते मूल, मुलगी म्हणून इथून सुरू झालेला प्रवास बहीण, मैत्रीण पुढे बायको आणि मग आई-आजी अश्या नात्यात नव्याने जन्म घेतच जाते.  हा "ती"चा प्रवास प्रेम, संयम, काळजी अशा विविध डब्यांमधून होत असतो.  तीच्या या प्रवासाच्या रेल्वेला जसे अनेक डबे जोडलेले असतात तसे हे डबे आणि मग त्यात तिची विविध माणसं, नाती म्हणून जोडली जातात.  निसर्ग तीला सोशिकता आणि जीवनातील जैविक आणि सामाजिक सत्य वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच उलगडून दाखवतो. तिथून मग पुढची प्रत्येक वर्ष तिला हाच निसर्ग प्रगल्भ बनत जातो. हा असा एकमेव प्रवास आहे ज्यात "ती"च स्वतः ड्राइवर असते, पॅसेंजर असते सिग्नल सुद्धा "ती"च पाडते आणि डेस्टिनेशन्स् सुद्धा "ती"च ठरवते. तीची ही ताकद विलक्षण आहे आणि आपण त्याचा अनुभव विविध क्षे...

वेड....."अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला."

वेड 11/02/2019 "अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला." "काय ना! या अभिजीतचं वेड काय विचारू नका. सुट्टी असली ना! की हा असाच तासनतास वरच्या खोलीत जाऊन बसलेला असतो." "किती वाचन करावे म्हणते मी.  वेड लागलय वाचनाचं नुसतं. जे नवीन जुनं पुस्तक मिळेल ते तो वाचतो आणि दोन दोन तीन तीन दिवसात संपून टाकतो." "अहो घारे काकू, असू दे. त्याच्या वाचनाचं आणि एखादा विषय स्पष्ट उलगडून सांगण्याच्या स्टाईल मुळे तर तो कॉलेजमध्ये आम्हा मित्रांमध्ये आणि शिक्षकांमध्ये फेमस आहे" असे कित्येक अभिजीत सध्या कमी होत आहेत. "चांगले बोलू शकतात पण त्यात सकसपणा नाही आणि चांगले लिहू शकतात पण त्यात स्निग्धता नाही" अशी अवस्था आहे. गेल्या दहा बारा वर्षात आणि नव्वदच्या दशकानंतर जन्मलेल्या सर्वच मुला-मुलींच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावते आहे.  प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्या नाटके कथा संग्रह आत्मचरित्र किंवा प्रवासवर्णनांची छोटी छोटी पुस्तकं वगैरे तर सोडाच पण साधा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाही. एक वेळ अशी होती की भेळपुरी च्या राहिलेल्या कागदावर...

आणि सुबोध भावे......"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू

"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू होता. मी जोरात ओरडलो 'जोश्या ही पारू कोण आहे रे स्टेजवर? च्यायला काय दिसतेय यार! शेजारच्या मुलींच्या हुजूरपागा शाळेतून कोणाला बोलावलयं का खास या डान्स साठी.?" "अरे बुध्द् या नाही रे...तो आपल्या वरच्या वर्गातला भावे आहे." सुबोधचा कदाचित रंगमंचावरचा हा तो पहिलाच परफॉर्मन्स असेल. तो त्या पारूच्या वेशात इतका सुंदर दिसत होता की आता खात्री पटते की बालगंधर्व त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं. अगदी आपले बनवाबनवी वाले महागुरु सुद्धा नाही. पुण्याच्या पेठी वातावरणात आणि एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा नूमविय सुबोध, आज मराठी रंग-चित्रसृष्टी वर एक हाती राज्य करतोय. आमचा हा आनंद फक्त अस्सल पुणेरी नुमवियंनाच कळू शकतो. तेव्हा नाही पण आता सुबोधला जवळून ओळखणारे पुण्यात अचानकच "खूप" झालेत. एक काळ असा होता की तो भरतच्या बाहेर (भरत नाट्यगृह, पुण्यातील लोकांना भरत म्हंटलं की रामायण नाही आणि मस्तानी म्हंटलं तर बाजीराव नाही...तर सदाशिव पेठ हे कळते. ) टपरीवर ...

"चिमटा" (काल्पनिक विडंबन)....काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली

काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली कळालेच नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात सभागृहात त्या विषयावर चर्चा आहे. त्यामुळे गेला आठवडा पासून त्या ५००-६०० फाइलींचा स्टडी करतोय. अचानक जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं, फ्रेश होउन बाहेर आलो, बघतो तर सौ. गाण्याच्या रेकॉर्डिंग ला आणि मुलगी शाळेला गेलेली. म्हणजे नक्कीच खूप उशीर झालेला उठायला. नेहमीप्रमाणे आंघोळ पुजा आटपली आणि ब्रेकफास्ट टेबलावर बसलो. आज आवडीचे "तर्री पोहा" होते नाष्ट्याला. खात असतानाच प्रवीण (आमचा पी ए) आला, दिवसभराचे शेड्युल अपडेट करायला. "साहेब, आज ह्या दोन महामंडळाचे कार्यक्रम आहेत, मग ही तीन ठिकाणी उद्घाटने, पक्ष कार्यकर्ते बरोबर बैठक आणि संध्याकाळी पाटील साहेबांकडे पुजेच्या तीर्थ प्रसादाला जायचे आहे." आम्ही अक्षरशः आ वासून बघतच राहिलो त्याच्याकडे, तोंडात पोह्यांचा घास तसाच. प्रवीण घाबरून म्हणाला"साहेब, काय झालं, काही होतयं का?" "अरे, काय झालं, काहीच झालं नाही का? आज एवढेच बाकी काही नाही? कोणता मोर्चा नाही? आंदोलकांबरोबर चर्चा नाही; दूध भाजीपाला वगैरे रस्त्यावर ...

ओह माय लॉर्ड(स्).......इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोल

इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते. एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका  त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट. आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते. आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा. आयपीएल आणि टिट्...

फादर्स डे निमित्त.. मी...बाबा आणि बाईक (काल्पनिक) ......आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर

आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर सुसाट चालवायला सुरुवात केली. का कुणास ठाउक, अचानक बाबाची आठवण आली. तो सुद्धा रस्ता मोकळा असला की असाच पळवायचा त्याची लाडकी यामहा 100. काय ते प्रेम त्या काळ्या ठेंगण्या ठुसक्या यामहावर. स्वतः च्या मुलीप्रमाणे जपायचा तीला. माझी धाकटी बहीणच जणू. पुण्यात आल्यावर बाबांनी पहिली घेतलेली आणि शेवटपर्यंत तीच वापरली. काळापरत्वे आमच्या कडे दोन टु व्हीलर आणि एक मोठी फोर व्हीलर आली पण बाबाची यामहा कायम चालू कंडिशनमधे.तो वापरायचा आठवड्यात किमान दोन तीन वेळा. मला, रोहीत आणि आईला यामहावर लांब लांब घेऊन जायचं त्याला फार आवडायचं. त्यात त्याला शान वाटायची. कोकणातील नागमोडी वाटा, महाबळेश्वर पसरणी घाट, भर पावसात आम्हाला भिजत फर्स्ट सेकंड टाकत सिंहगडावर नेलेलं अजुनही मनात घट्ट आहे. तो कोणालाही ती वापरायला द्यायचा नाही, मला आठवतंय ते फक्त बाबाचा बेस्ट फ्रेंड सुहास काका कधीतरी चालवायचा. दर रविवारी यामहा स्वच्छ धुवायची, आयलींग ग्रीसींग करायचं. आधी काही वर्ष साध्या आईल नी पुसुन चकाचक करायचा. पुढे मग त्याला बाइक शायनिंग क्रिम मिळाले. त्यांच्या परदेशात...