आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू नाना सोसायटी तला ह्याचा मित्रच) "आपला मानूस". मी आतूनच म्हणालो मानूस नाही रे माणूस.
आजच त्याचा मराठी चा पेपर मिळाला होता. माझा मुलगा चौथीत आहे, अर्थातच इंग्रजी मिडीयम स्कूल. पुढे जाउन तीच व्यवहारी भाषा महत्त्वाची वैगेरे वैगेरे (स्वतः चे मानसिक समाधान) म्हणून इंग्रजी मिडीयम मधे टाकले. त्याच्या पेपरातील मराठी तल्या चुका पाहून उर भरून आला (उपहासाने) की अरे हा आपल्याच मुलाचा पेपर आहे ना? उदा. भेटकारड , चितर काढन्यात मगन होता, पोशण करते, गाडी धुतोय....
खरं च चौथीत मी शाळेत असतांना मराठीत ह्या अशा चुका होत नव्हत्या. अर्थातच मुलाची चुक कमीच आहे. आपली मराठी भाषा जीला आपण आपली मायबोली मायमराठी म्हणतो तीचे नवीन पीढितील हे स्वरुप पाहून जरा वाईट च वाटले. पुन्हा हा मराठी विषय नुसता अभ्यासाला, त्या पेपराला मार्क नाहीत. म्हणजे मुलांना आपोआपच त्या बद्दल प्रेम किंवा जाणीव नाही. पालकपण म्हणतात बोलता येतयना! (येते आहे ना!) लिहायला कुठे लागणारे पुढे?
आतातर cosmopolitan युगात मराठी, हिंदी, गुजराती.. इ. भाषा फक्त English मधे बोलताना शब्द आठवला नाही तर Filler म्हणून च वापरतात.
हि आपली "प्रगती" बघता कदाचित पुढील २५ वर्षात मराठी भाषा हि देखील पाली , मोडी सारखी इतिहास संशोधन मंडळ अथवा भारतीय पुरातत्व खात्यात जतन केलेली म्हणून होउन बसेल.
उगाच भावनिकता नाही पण कुठं तरी मनात खुपच वाईट वाटले. "मोत्या सारखं एकटाकी अक्षर आहे तुमचं" हे वाक्य बहुतेक कधीच कोणाला ऐकू येणार नाही. शाळतले मराठी चे श्री. परचुरे सर आठवले. अक्षर सुधारण्यासाठी लावलेला श्री. खेर सरांचा क्लास आठवला.
"काय हे कुत्र्या मांजराचे पाय काढलेत, काही च समजत नाही ये, पत्र नीट लिही जरा" आईचे शब्द कानात घुमलेले आठवले.
आपल्या मराठी भाषेसाठी एका पिढीतच आपण "कुठुन...कुठपर्यंत" आलो ह्याची खंत वाटू लागली.

साहेबाची भाषा अजूनही जगावर राज्य करते, आपण येनकेनप्रकारेण अजुनही गुलाम च आहोत
मग पुढे काय, बदल घडवायला लागेल, उपाय तर करावेच लागतील. अर्थातच उपाय हे घरगुती करावे लागतील, कारण शाळा तर इंग्रजी आहे.
सर्वांनी मिळून आपल्या परीने जेवढे काही प्रयत्न होतील ते नक्की करा. मराठी लिहणे, वाचणे आणि बोलणे हयात आपल्या मुलांना Distinction नाही पण किमान First class तरी नक्की मिळेल ह्याची काळजी घ्या।
आणि हो पिक्चर चे नाव "आपला मानूस" च आहे, मला उगाच वाटले कि मुलाने मराठी लिहताना जशी चुक करतो तशीच बोलताना ही केली कि काय....
विचार आवडला तर नक्की Forward करा....नावासकटची अट नाही कारण नाव नाही तर विचार महत्त्वाचा।
मिलिंद सबुध्दे..
३१/०१/२०१८
३१/०१/२०१८
मस्त
ReplyDelete