Skip to main content

Posts

जमलेल्या माझ्या तमाम...........सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ पुणे महानगरपालिकेची पाटी वाचली "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्म ठिकाण",

सदाशिव पेठेतल्या नागनाथ पाराजवळ पुणे महानगरपालिकेची पाटी वाचली "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्म ठिकाण", का कुणास ठाऊक पण मला लहान पणी शाळेच्या ट्रीपला कोकणात गेलो असताना "चिखली" या गावातील वाचलेले पाटी आठवली "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे हे जन्मस्थान" कोणतीही राजकीय किंवा चळवळीची पार्श्वभूमी अथवा भक्कम आर्थिक पीढीजात असलेली इस्टेट असं काहीही नसताना फक्त प्रबोधनकारांच्या प्रखर पुरोगामी विचारांचे संस्कार यावर शून्यातून एक राज्यव्यापी संघटना उभी करण्याचे कसब असलेला जगातील एकमेव नेता "बाळ केशव ठाकरे" शिवसैनिकांचा विठ्ठल आणि सर्वांसाठी असलेले "बाळासाहेब" एखाद्या इंग्लिश किंवा हिंदी चित्रपटाच्या हिरोला शोभेल अशी स्टाईल मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि बाहेर असतील तर तसाच गॉगल. ओठत धूर सोडणारा पाईप आणि मग त्यातून निघणारे शब्दांचे अंगारे. त्यावेळेस पांढरी टोपी आणि जॅकेट घालणाऱ्या त्या टिपिकल नेत्यांना नक्कीच त्यांचा हेवा वाटत असेल. स्वतःवर कधीही वैयक्तिक भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडणार नाहीत याची पक्की खात्री असल्यामुळेच बाळासाहेबांनी कधीही पा...

२२ यार्डचा देव......सचिन रमेश तेंडुलकर हे अकरा अक्षरी (मराठीत) नाव जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी जपनामाचे जसे बारा अक्षरी मंत्र

सचिन रमेश तेंडुलकर हे अकरा अक्षरी (मराठीत) नाव जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी जपनामाचे जसे बारा अक्षरी मंत्र असतात तसे मंत्रोच्चार आहे. हातात जपमाळे ऐवजी बॉल आणि बैट घेऊन सर्व 'बालक-पालक' ह्या मंत्राचा जप करत असतात. ह्या नावाची आणि व्यक्ती ची मोहिनी ही भल्याभल्यांना पडली आणि तीच्या बैटच्या कर्तृत्वाची जादू बौलरसनी अनुभवली. स्कल कैप घालून वेस्ट इंडिजच्या सहाफुटीवर उंचीच्या भेदक चेंडूंच्या मार्यासमोर ताठ कण्याने उभा राहणाऱ्या सुनील गावस्कर चा फोटो घरात लावून ज्या मुलांने प्रैक्टिस केली, तो नक्कीच अदभूत चमत्कार घडवणार हे श्री आचरेकर सरांसारख्या चाणाक्ष कोचला पक्के ठाउक असेल. सचिन तेंडुलकर हे नावच असे आहे की,क्रिकेट मधले वरवरचे कळणार्या माझ्या सारखा पुणेरी माणूस त्याच्यावर लिहण्याचे धाडस करतोय. अर्थात पुलंच्याच भाषेत सांगायचं तर माहीत नसलेल्या विषयावर उसन्या आत्मविश्वासाने बोलायचं धाडस फक्त पुणेकर च करु शकतो म्हणा. तीन दशके ज्यानी ह्या खेळावर, त्यातल्या खेळाडूंवर आणि (सावरकरांच्या स्वपनातल्या) अखंड भारताच्या मनावर राज्य केले तो हा आमचा सचिन. मी कधीच कुणाला, अगदी पाच वर्षाच्या...

बकेटलीस्टच्या निमित्ताने... परत पुन्हा माधुरी..........आजच बकेटलीस्ट पाहिला... माफ करा पहिली. अहो जेव्हा इतक्या वर्षांनी ती पुन्हा ७० एम एम च्या मराठी रुपेरी पडद्यावर

 बकेटलीस्टच्या निमित्ताने... परत पुन्हा माधुरी.......... आजच बकेटलीस्ट पाहिला... माफ करा पहिली. अहो जेव्हा इतक्या वर्षांनी ती पुन्हा ७० एम एम च्या मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार असेल, तर पिक्चर पहायला कोण जातो तुम्हीच सांगा. म्हणूनच मी वर म्हंटलं "पाहिला.. नाही पाहिली" तीचं तेच मधाळ हास्य, तेच टपोरे बोलके डोळे, तोच मिश्कील पणा, तशीच अदा, तोच अभिनय आणि त्याच घायाळ करणाऱ्या अदा. गेली पंचवीस वर्ष वयाच्या विविध वळणांवर आम्ही भाळतोय तीच्यावर. सिनेमात तीचं सहज वावरणं आणि संपूर्ण सिनेमा तीच्या  भोवतीच फिरणं म्हणजे आमच्या सारख्या रसिकांना पर्वणीच. सिनेमा पाहताना जाणवलं तीचं थोडं वय दिसायला लागलयं आता, पण चंदनाचं खोड कितीही जुनं झालं तरी त्याचा सुगंध कमीहोत नाही आणि वाईन जशी जितकी जुनी तितकी मधुर. एक दोन तीन मधल्या केब्रे डान्स पासून ते ह्या सिनेमातील होउन जाउ द्या गाण्यातील न्रुत्या पर्यंत तीची सर्व गाणी डोळ्यासमोर झरकन आली. अनेकविध सिनेमातल्या प्रत्येक न्रुत्यामधे तीचा संस्कारी संयम कायम दिसला. सैलाब मधील कोळी डान्स, राजा मधील आंखीयां चुराउ, बेटाची धकधक असेल किंवा मग चोल...

सहज सुचलेलं..आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू

आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू नाना सोसायटी तला ह्याचा मित्रच) "आपला मानूस". मी आतूनच म्हणालो मानूस नाही रे माणूस. आजच त्याचा मराठी चा पेपर मिळाला होता. माझा मुलगा चौथीत आहे, अर्थातच इंग्रजी मिडीयम स्कूल. पुढे जाउन तीच व्यवहारी भाषा महत्त्वाची वैगेरे वैगेरे (स्वतः चे मानसिक समाधान) म्हणून इंग्रजी मिडीयम मधे टाकले. त्याच्या पेपरातील मराठी तल्या चुका पाहून उर भरून आला (उपहासाने)  की अरे हा आपल्याच मुलाचा पेपर आहे ना? उदा. भेटकारड , चितर काढन्यात मगन होता, पोशण करते, गाडी धुतोय.... खरं च चौथीत मी शाळेत असतांना मराठीत ह्या अशा चुका होत नव्हत्या. अर्थातच मुलाची चुक कमीच आहे. आपली मराठी भाषा जीला आपण आपली मायबोली मायमराठी म्हणतो तीचे नवीन पीढितील हे स्वरुप पाहून जरा वाईट च वाटले. पुन्हा हा मराठी विषय नुसता अभ्यासाला, त्या पेपराला मार्क नाहीत. म्हणजे मुलांना आपोआपच त्या बद्दल प्रेम किंवा जाणीव नाही. पालकपण म्हणतात बोलता येतयना! (येते आहे ना!) लिहायला कुठे लागणारे पुढे? आतातर cosmopol...

पब्लिक

"ये जो पब्लिक है ये सब जानती है ये जो पब्लिक है".. हे गाणं ऐकलं की मला नेहमी हिंदी पिक्चर अथवा कोणत्याही हिट फ्लॉप सिनेमाची आठवण येते. हॉलिवूडच्या स्टीवन स्पीलबर्ग पासून ते आत्तापर्यंतच्या नीरज पांडे पर्यंत कोणताही टॅलेंटेड अनुभवी आणि मुरलेला दिग्दर्शक असो, एखाद्या प्रथितयश निर्माता असो, अथवा सुपरस्टार असो, या पब्लिकचं मन असं काही ओळखू शकलेला नाही. जगाच्या पाठीवर बहुतेक असा कोणीही नसेल जो सिनेमा यायच्या आधी छातीठोकपणे सांगेल की हा पिक्चर सुपर डुपर हिट होईल. हां ! आता स्वतः स्वतःची फॅन फॉलोइंग फौज तयार करून तीन हजाराच्या वर स्क्रीनवर चित्रपट लावून शंभर-दोनशे करोडची लाल करणारे भाई लोक आहेत. पण ते काही सर्वसमावेशक हिट चित्रपटात गणले जात नाहीत, आणि अहो त्यांनाही ह्या पब्लिकनी "किक" मारलीच आहे की. तर, या पब्लिकची नस ओळखणे फारच कठीण. ज्या स्पीलबर्गच्या पहिला जुरासिक पार्क ला जगभर लोकांनी डोक्यावर घेतलं त्याचाच पुढचा जुरासिक ची काय अवस्था झाली ते सर्वश्रुत आहे. आपल्याकडे शोमन राजकपूर ला सुद्धा ज्या "संगम" बद्दल काहीच अपेक्षा नव्हती, तो पार पडदा फाडून सु...

रंगीबेरंगी

२०१८ मधे... सहज सुचलेलं.. रंगीबेरंगी कॉकटेल... 🍹 🍹 आपण एखाद्याला *द्रुष्टी*  🤓  देऊ शकतो पण...*द्रुष्टीकोन*  😇  नाही -- तुम्ही, एकदा का समोरच्या प्रत्येकाला "सर" म्हणायला शिकलात.. की.........."सरसर" वर पोहचतां। -- एकेकाळी *फोटो* *काढायला* माणूस ठेवायचे..आणि आता (_mobile मधून_) काढून *टाकायला* ठेवतात... -- कोकणस्थ कसा ओळखाल.... ज्याच्या हेडफोन कॉर्डचा आणि विचारांचा कधीही गुंता झालेला नसतो.. -- तेव्हा... आमच्या घरचा *गणपती* सध्या... आमचा घरचा *बाप्पा* -- साम्यवाद, समाजवाद, पुंजीवाद, राष्ट्रवाद ह्यांच्या पेक्षा *धन्यवाद* अधिक माणुसकी जपतो | -- सध्या जीला *ट्रोल* करण्याची हिंमत कोणात नाही अशी बहुमुल्य गोष्ट म्हणजे *पेट्रोल* -- प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आपण ठरवायचं की आपल्या *छाप्याची* सिंहांची बाजू बघायची आहे का? *काट्याची* बघून ते पंचवीस पैशाचं का बंदा रुपाया ह्याची चिंता करायची आहे -- मी सच्चा सैनिक आहे आणि फक्त *मातोश्री* चे आदेश मानतो बायको म्हणते *You are Moma's Boy* -- *जळणे* हा गुणधर्म तसा वाईट नाही। फरक इतकाच की *जळून...* उदबत्ती सारखं .. *द...

SELF MADE MAN

SELF MADE MAN The Person who proved this Statement 100% true. Re sharing my BDay wishes... "रूस्तम" अक्षयकुमार जेव्हा सच्चा Superstar actor चा पिक्चर येतो, तेव्हा.... १. "उडता" उडता फिल्म प्रदशर्शना आधी लीक झाली म्हणून बोंब होत नाही २. कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून आंदोलने होत नाहीत ३. भाई भैय्या सारखी कोटीच्या कोटी उड्डाणाची तद्दन चर्चा होत नाही ४. आणि हो प्रत्येक वेळी लग्न ठरलेल्या हिरोइन बरोबर 'दिलवाले' म्हणत बादशागिरी नाही ५. उगाच protin वाली body building ची हवा नाही...Original body देसी.. ६. 'जोहर' आणि 'चोप्रा' सारख्या hi fi बैनर ची लेबलं नाहीत ७. कपूर, बच्चन, रोशन सारखी पुण्याइ पाठीशी नाही तरीही माझ्यासारख्या असंख्य 'अक्षय' रसिकांना खात्री असते ती पिक्चर हिट होण्याची....कारण.. "ना हम अमिताभ, ना दीलीपकुमार, ना किसी हिरो के बच्चे...हम है सीधे साधे अक्षय अक्षय" © Milind Sahasrabudhe.