बकेटलीस्टच्या निमित्ताने... परत पुन्हा माधुरी..........आजच बकेटलीस्ट पाहिला... माफ करा पहिली. अहो जेव्हा इतक्या वर्षांनी ती पुन्हा ७० एम एम च्या मराठी रुपेरी पडद्यावर
बकेटलीस्टच्या निमित्ताने... परत पुन्हा माधुरी..........
आजच बकेटलीस्ट पाहिला... माफ करा पहिली. अहो जेव्हा इतक्या वर्षांनी ती पुन्हा ७० एम एम च्या मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार असेल, तर पिक्चर पहायला कोण जातो तुम्हीच सांगा. म्हणूनच मी वर म्हंटलं "पाहिला.. नाही पाहिली"

तीचं तेच मधाळ हास्य, तेच टपोरे बोलके डोळे, तोच मिश्कील पणा, तशीच अदा, तोच अभिनय आणि त्याच घायाळ करणाऱ्या अदा. गेली पंचवीस वर्ष वयाच्या विविध वळणांवर आम्ही भाळतोय तीच्यावर. सिनेमात तीचं सहज वावरणं आणि संपूर्ण सिनेमा तीच्या भोवतीच फिरणं म्हणजे आमच्या सारख्या रसिकांना पर्वणीच. सिनेमा पाहताना जाणवलं तीचं थोडं वय दिसायला लागलयं आता, पण चंदनाचं खोड कितीही जुनं झालं तरी त्याचा सुगंध कमीहोत नाही आणि वाईन जशी जितकी जुनी तितकी मधुर.
एक दोन तीन मधल्या केब्रे डान्स पासून ते ह्या सिनेमातील होउन जाउ द्या गाण्यातील न्रुत्या पर्यंत तीची सर्व गाणी डोळ्यासमोर झरकन आली.
अनेकविध सिनेमातल्या प्रत्येक न्रुत्यामधे तीचा संस्कारी संयम कायम दिसला. सैलाब मधील कोळी डान्स, राजा मधील आंखीयां चुराउ, बेटाची धकधक असेल किंवा मग चोली के पिछे फेम खलनायक. ती कधीच वल्गर दिसली नाही. ही तीची खासियत मधुबाला, नुतन आणि वहिदाच्या तोडीस तोड आहे. पुकार मधल्या के सरा सरा मधली जुगलबंदीत तर सिनेन्रुत्यामधील 'देव' प्रभुदेवाला सुध्दा जीच्या न्रुत्याची भुरळ पडली ती ही देवी माधुरी.

तेजाब, उत्तर दक्षिण, रामलखन, दिल, खलनायक, कोयला, इलाका सारख्या तद्दन मसालेदार सिनेमां पासून ते कौटुंबिक हम आप के है कोन तीने केला. चोप्रांच्या रोमांटीक स्टाईल दिल तो पागल है तीनी चक्क शाहरुख आणि करीश्मा असुन खाल्ला. नानाच्या प्रहार मधे डेरिंग करून विनामेकप सौंदर्य दाखवले, तर प्रकाश झा च्या म्रुत्युदंड सारखा वास्तववादी सिनेमा केला. अश्या विविध सिनेमात तीने तीचे नाणे खणखणीत वाजवले. मोदी सरकार ची 'जादू' आहे की नाही ची परीक्षा जसे पत्रकार दर निवडणूकीत घेतात, तशी तीच्या 'जादू' ची परीक्षा सिनेपत्रकारांनी वेळोवेळी घेतली, मात्र ती कायमच अव्वल ठरली.
नर्गिस ने जशी मदर इंडियापासुन साठच्या दशकात स्त्री प्रधान चित्रपटांची लाट निर्माण केली, अगदी तशीच माधुरी च्या बेटाने नव्वदीत आणली. करीयरच्या विविध टप्प्यावर तीचे अनेक अभिनेत्यां बरोबर नाव जोडण्यात आले. परंतु ही नावं मासिकांच्या कागदावर च राहिली. प्रत्यक्षात मात्र कोणीही तीला 'नावं' ठेवू शकले नाहीत. कदाचित हा तीच्यातल्या कोकणी मराठी संस्कारांचा परिणाम असेल.
दयावान मधे विनोद खन्नाची नायिका आणि काही वर्षांनी मोहोब्बत मधे अक्षय खन्नाची नायिका. खरंच तीच्या सम तीच.
नजाकत काय असते तीने देवदास मधे पुरेपूर दाखवली. अभिनयाचा बाप माणुस नाना समोर वजुद मध्ये तोडीस तोड उभी राहिली. अमिताभ, ऋषी कपुर पासुन खान त्रिकुट, खिलाडी कुमार, व्हाया रणबीर कपूर करत आता पार आमच्या मराठमोळ्या फास्टर फेणे सुमीत राघवनची नायिका हा तीचा भव्य प्रवास थक्क करणारा आहे.
हे सगळं करताना एक महत्त्वाचे म्हणजे, मधील दहा वर्षे एका नाऑन फिल्मी पण प्रथितयश डॉक्टर शी लग्न करून नेटाने संसार केला. दोन मुलांची आई आणि समर्पित ग्रुहीणी बनून अमेरिकेत वास्तव्य केले. खरंच किती कौतुक करायचे हीचे. अहो बॉलिवूड च्या स्टारडम पासुन दुर जाणे भल्या भल्या अभिनेत्रींना जमले नाही, परंतु हिने ते लीलया पेलले. आणि मैडम आता परत कमबॅक करून मार डाला म्हणायला मोकळ्या...
म्हणूनच अभिमान वाटतो आम्हाला माधुरी दीक्षित चा कारण...
ती मराठी मी मराठी
ती मराठी मी मराठी
-मिलिंद संबुध्दे.
Comments
Post a Comment