Skip to main content

Posts

रस्ता..

 रस्ता.. घरातून घाईघाईने निघतांना मनात काय काय चालू असतं ना. वेळेत पोहचू की नाही, वाटेत ट्रॅफिक चा शॉट नसेल ना. दुपारी लंच नंतर महत्वाची मिटींग आहे आज. त्यात काय दाखवायचं, काय बोलायचं. संध्याकाळी आल्यावर काय स्वयंपाक करायाचा... सकाळची पोळी भाजी पटापट आवरली. सगळ्यांना आवडते म्हणून कांदा टोमॅटो कोशिंबीर केली, त्यात जरा वेळ गेला.  परवा जेवताना मी आईला असं पटकन बोलायला नको होतं. सारखं मनात तेच येतयं, बघू जमलं तर योग्य वेळ बघून विषय क्लिअर करेन. असं असं बोललं तर? पण, आवडेल का तीला ते, नको जरा सामोपचाराने सविस्तर बोलू.  बापरे लाल पडला का? गेली इथंच ३ मिनिटे. पुढच्या चौकातला सिग्नल continued मिळाला तर बरं. वेळेत पोहचले म्हणजे झालं, मोठे सर यायच्या आत. वा सुटला बाबा, इथं जरा गाड्या कमी आहेत ते एक छान आहे. पुढच्या रविवारी ताई येणार घरी. त्यांना येताना कयानीचे केक आणायला सांगते. हल्ली कैम्पात जाणं होतंच नाही. ताई येणार म्हणजे घर चकाचक आवरणं आलं. नाहीतर सासुबाईंन समोरंच ऐकावं लागेल. हसुंच येतं मला दरवेळेस कितीही आवरलं तरी काही तरी असतंच त्यांचं.  "अहो अहो" आजोबा रस्त्यातच काय म...

"आणि विजय पराभूत..."

 दिवाळी विशेष 🙏 "आणि विजय पराभूत..." नव्वदच्या दशकात रंगीला सिनेमांमध्ये आमिर खानचा एक डायलॉग फेमस झाला होता. तो पिक्चरच्या थिएटर बाहेर ब्लॅकनी तिकीटं  विकत असतो. "दस का बीस, बाल्कनी बीस का तीस, सिर्फ दो बची है".  एकजण येतो आणि विचारतो "ऐ, दोन तिकीट है क्या? जरा कॉर्नर की देना" आमिरच तो, तो म्हणतो " है ना एक ये कॉर्नर और एक दूसरी कॉर्नर की" संपूर्ण थिएटर या वाक्याला टाळ्या आणि हशाच्या गजरात दुमदुमून जायचं. बाल्कनी, स्टॉल,अप्पर स्टॉल, ड्रेस सर्कल अशा विविध terminologyची भर आमच्या सामान्य ज्ञानात पडली ती ह्या थिएटर्समुळेच. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात मित्र-मैत्रिणी नातेवाईकां प्रमाणेच एक अविभाज्य घटक म्हणजे पिक्चरचे थिएटर. आपल्याकडे जशी विविध देवांची मंदिरा प्रसिद्ध आहेत जशी दगडूशेठचा गणपती, तांबडी जोगेश्वरी तशीच ही विविध थिएटर्स मनोरंजनाची मंदिरच होती. होती म्हणायचं कारण आता मनोरंजन प्रत्येकाच्या हातात सामावला आहे.   बालाजी, शिर्डी, पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी भाविक रात्र-रात्रभर रांगा लावून थांबायचे. अहोरात्र थांबून देवदर्शन घेतल्यावर त्यांच्या च...

लुप्त

  लुप्त आज सकाळी मुली बरोबर भाजी घ्यायला बाहेर पडलो होतो. अचानक रस्त्याच्या बाजूला दोन बायका कोळशावर कल्हई लावताना पाहिल्या. चार पावलं पुढे गेल्यावर मनात आलं आपण समाजातील कलहं कायमच बघतो, कल्हई क्वचितच बघायला मिळते. आपल्या मुलांना कल्हई म्हणजे काय ते पण कळायला हवं.  मग काय तसाच मागे फिरलो आणि त्या दोघेजणींशी कल्हई करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढत छान गप्पा मारल्या. दोघांपैकी एक जण साधारण चाळीशीतली तर एक अगदीच म्हातारी आजी. म्हातारीचा उत्साह तेवढाच दांडगा होता (ज्या उत्साहाने तीने केसांना मेंदी लावलेली होती 😀). मी तीलाच विचारायला सुरुवात केली की तुम्ही कधीपासून करताय वगैरे वगैरे.  मग काय आजीबाईचा चेहरा खुलला आणि सांगू लागली. "दादा पूर्वी लोकं घराघरातून चार पाच पातेली-भांडी घेऊन यायची. रोजचा धंदा होता आमचा. आता मात्र तसं नाहीये. चार-पाचच गिऱ्हाईकं मिळतात, ती सुद्धा रोजची नाही. आली तरी एखाद दुसरे पातेलं-भांडं आणतात."  "काय करायचं बोला! सामान बी महाग झालंय.   कास्टिक सोडा, नवसागर, कोळसा अन् कथिल धातूची पट्टी. सगळ्याची किंमत वाढलीय बघा. आम्हाला पन पूर्वीसारखं परव...

Remote... तरीही जवळचा

  Remote... तरीही जवळचा त्या दशकांमध्ये "जिच्या हाती पाळण्याची दोरी.." तसं घरा-घरात "ज्याच्या हाती रिमोटचं बटण तो.." असं समीकरण होतं. रात्री साडे आठची वेळ:  आमची आई घाईघाईत हॉलमध्ये आली. तिच्या ठरलेल्या सिरीयलचं टाइमिंग झाले होते. रिमोट कुठेय म्हणून शोधत होती. बाबा सोफ्यावर पेपर वाचत बसले होते. त्यांच्याकडे बघून म्हणाली (नेहमीच्या चिडक्या स्वरात, कारण मनात हेच की ह्यांनीच बातम्या बघून कुठे तरी इकडे तिकडे ठेवला असणार.)  "अहो  बघितलाय का,  कुठे आहे remote" बाबा पण सॉलिड, पटकन म्हणाले " सध्या शरद पवार साहेबांकडे आहे". आम्ही सगळे जोरजोरात हसलो. आईला पण हसू आवरले नाही, जरी तिला रिमोट अजून सापडला नव्हता तरी.  तसाही सध्या महाराष्ट्राचा रिमोट "बारामतीच्या गोविंदबागेतच" आहे. त्याच्याआधी "नागपूरच्या रेशीमबागेत" होता. मात्र सुरुवात झाली ती कलानगर "मातोश्रीच्या परस बागेतून".  खरंच, रिमोट ही अशी वस्तू आहे की जेव्हा ती हातात येते ना तेव्हा आपण जणू काही काळा पुरते अनिभिक्त सम्राट असल्यासारखं वाटतं. बदाम सात खेळताना शेवटची सत्ती आपल...

रोहित मुंबईकर ; शर्मा दिल्लीवाले

 "रोहित मुंबईकर ; शर्मा दिल्लीवाले" "ठेविले अनंते तैसेची रहावे|| चित्ती असू द्यावे समाधान||" या रामदास स्वामींच्या श्लोकाचा अर्थ, क्रिकेट जगतात कोण तंतोतंत अवलंबत असेल तर तो रोहित शर्मा. मैदानात किंवा मैदानाबाहेर आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा एकंदरीत त्याच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून तो कायम अशाच वृत्तीचा असेल असे वाटते. फारशी कुठल्या गोष्टीची चिंता, इर्षा न करता Casual  कसं राहावं तर रोहित शर्मा सारखा.  कॅप्टन केलं तर जिंकायचंच आणि नुसताच फलंदाज म्हणून घेतलं तर तडाखेबाज फलंदाजी करायची.  रोहितला मैदानावर मॅच चालू असताना कधीही अति प्रतिक्रिया देतांना किंवा प्रतिक्रियात्मक देहबोली मध्ये  बघितलेला फारसं आठवत नाही. फलंदाजी करताना सुद्धा एखादा सुरेख शॉट अगदी casual करून टाकण्याचं कसब त्याच्यात आहे. कडक कव्हर ड्राईव्ह मारणं, लेगला पुल मारणं हा सर्वसामान्य फलंदाजांसाठी कौतुकाचा विषय असतो. इतरांसाठी महत प्रयास करून मारल्यासारखं किंवा ठरवून मारल्यासारखं वाटतं. ते सगळे शॉट रोहित इतके सहज म्हणून मारुन जातो की त्या शॉटची किंमतच राहत नाही.  Shot मारल्यानंतर कोणतेही विजय...

सुचणं

 # सुचणं सुचलेल्या प्रतिभेची प्रतिमा जर कागदावर योग्य प्रकारे उमटवता आली, तर त्याचं उत्तम साहित्य व्हायला वेळ लागत नाही... काही सुचतच नाही सध्या? "खूप दिवस झाले, तुझा एखादा लेख article आलं नाही Facebook वर". असं कोणी म्हटलं ना की मनात येतं "काय सांगू?" खूप विचार, खूप विषय मनात येतात आणि चमकून जातात. तेवढ्यापुरतं काहीतरी सुचतं परंतु नंतर पुढे मात्र वाढत नाही. एखादा विषय सुचणं किंवा खरं सांगू का? बसलोय आणि सुचतं असं काहीच नसतं. जसं घरातले दिवे गेलेत, आपण अंधारात मेणबत्ती लावून बसलोय. अचानक पापणी लवताक्षणी पटकन दिवे येतात. ज्या खोलीत बसलोय तिथली ट्यूब पटकन पेटते. तसंच होतं. कोणीतरी काहीतरी बोलत असतं, आपण काहीतरी ऐकत असतो, बघत असतो किंवा वाचत असतो. समोरची बोलणारी व्यक्ती काहीतरी बोलून जाते आणि पटकन आपली ट्यूब पेटते. तोवर डोक्यातले दिवे गेलेलेच असतात. त्या खोलीतली ट्युब पेटली की आपण लगेच बाहेर बघतो. आजूबाजूचे दिवे मग एकामागोमाग पेटतात. अगदी तसंच होतं पहिली ट्यूब पेटते, डोक्यात विषय किंवा विचार क्लिक होतो. मग इतर दिवे जसे  पाठोपाठ लागतात तसं त्या विषयाच्या अनुषंगाने फटाफट...

करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे

 # कोरोनायोद्धा *करोना संग्रामातील तात्या (राजेश) टोपे* भारतात अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व तात्या टोपे करत होते. तसेच सध्या महाराष्ट्रात कोरोना संग्रामाचे राजेश टोपे करत आहेत.   "कृपया माझ्या विधानाचा विपर्यास करू नका" त्यांची ही कळकळीची विनंती ऐकून मनात चलबिचल झाली. आजकालच्या प्रसारमाध्यमां समोर बोलताना भले भले जण घाबरतात. काही थोर मंडळी तर प्रसारमाध्यमांसमोर येत सुद्धा नाहीत. आपल्या कडून चुकून बोलून गेलेल्या वाक्याची चुकीची ब्रेकिंग न्यूज होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांची जीभ चावली. आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब अशी कळकळीची विनंती करताना, त्यांना नक्कीच काही वर्षांपूर्वीची आठवण मनात झाली असेल. हयाच देशाच्या प्रसार माध्यमांनी आपल्या एका साध्या,सरळ, कार्यक्षम गृहमंत्र्यांची विकेट घेतली होती. तीसुद्धा अशाच एका संकटकाळात.  मागील वर्षीच्या एप्रिलपासून हा माणूस सदैव अविरतपणे कोरोना विरुद्ध उभा ठाकला आहे. क्षणाचीही उसंत न घेता तो महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेची गेली १२ महिने अहोरात्र वाहून घेऊन सेवा करतोय. अतिशय कठीण प्रसंगांचा साम...