Skip to main content

"सत्या"चा प्रयोग............३ जुलै१९९८, बरोबर वीसवर्षापूर्वी जुलै च्या भर पावसात सत्या प्रदर्शित झाला आणि मुंबई च्या त्या २६जुलै

३ जुलै१९९८, बरोबर वीसवर्षापूर्वी जुलै च्या भर पावसात सत्या प्रदर्शित झाला आणि मुंबई च्या त्या २६जुलै च्या पावसासारखा तुफान चालला.
सिनेमाच्या सुरवातीलाच पावसाचा शॉट..धोधो पावसात दोन भुरटे गुंड स्कुटर वरुन पळून जातायत आणि पोलीस मागे लागलेत. स्कुटर घसरते, दोघं जोरात आपटतात, एकजण कसाबसा त्या मुंबई च्या घाण वस्ती तून वाट काढत पळून जातो. दुसरा स्कुटरखाली पाय अडकल्याने सापडतो. नेक्स्ट शॉट थेट कोर्टात.. तो सापडलेला गुंड कठड्यात उभा " कुछ मालूम नही साब, हम तो फोन पे काम करता है।" कीधरसे आया था फोन ".दुबई से बाकी हम को कुछ नही मालूम साब"..कट..
तिथेच आपल्याला जाणीव होते की पुढील तीन तास आपण काय बघणार आहोत.
राम गोपाल वर्मा उर्फ रामु चा "सत्या". हिंदी चित्रपट स्रुष्टीला पडलेले अंडरवर्ल्ड चे सुखद स्वप्न. एक अफलातून, नावीन्यपूर्ण आणि वास्तवाच्या जवळ नाही तर वास्तव च दाखवणारा सिनेमा.
मजा बघा दिग्दर्शक "राम" सिनेमा चे नाव "सत्या"आणि कथा रावणाची. हा सिनेमा म्हणजे एखादा वास्तववादी सिनेमा कसा असावा ह्याची कार्यशाळा आहे. तुम्ही कितीही वेळा हा पाहीलात तरी तुम्हाला दरवेळेस काही तरी नवीनच सापडते.
सिनेमाचा हिरो सत्या ज्याच्या नावावर हा सिनेमा आहे , ज्याची हिरोइन उर्मिला मातोंडकर आहे, परंतु सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर लक्षात राहतो तो फक्त "भिक्कू"..भिक्कू म्हात्रे..मनोज बाजपेयी.
हा तोच मनोज होता जो गोविंद निहलानी च्या द्रोहकाल सिनेमात एक बाजू चा साइड एक्टर नक्षलवादी होता. सत्याची हीच खासियत आहे, मुळ हिरो "चक्रवर्ती" सोडून ह्या सिनेमातील बाकी सर्व कलाकार रातोरात हिंदीत हिट झाले. त्यातल्या काहींना तर केवळ सत्यात होता हा ह्या एका सर्टिफिकेट वर पुढील काही वर्षे रोल मिळत गेले.
मनोज बाजपेयी, गोविंद नामदेव, सौरभ शुक्ल, राजेश जोशी, मकरंद देशपांडे, शेफाली छाया असे बरेच दादा कलाकार की जे समांतर सिनेमा करत, चाय कटींग पीत, मुंबई च्या नुक्कडवर सिगारेट चे झुरके मारत असायचे त्यांना रामुने एका रात्री त स्टार बनवले. हि खरी दिग्दर्शकाची ताकद आणि ती रामुत ठासून भरलेली.
सत्यातील कैमरा चा प्रत्येक एंगल हा नवीन होता जसा टेबलाखालून, खिडकीच्या गजांमधून नव्वद डिग्री वरून थेट खाली रस्त्यावर, थिएटरमध्ये जशाच्या तसा.
रामुची खासियत म्हणजे एखादा क्लायमॅक्स शॉट मधेच ब्लॅक आउट करून त्या नंतरची घटना दाखवायची. जसे बंदुकीतून समोरच्या ला गोळी मारली, आवाजपण येतो पण गोळी लागून पडलेली व्यक्ती न दाखवता थेट पुढचा शॉट. आपण समजून घ्यायचं काय ते. त्याचा सिनेमा हा जरा फिल्मी प्रेमी जाणकारांसाठीच असतो.
सत्या सिनेमातला प्रत्येक शॉट, background music, location वर इतकं बारकाईने काम की विचारायची सोय नाही. आपण जणू त्या द फेमस दगडी चाळीत आत शेवटच्या खोलीपर्यंत गेल्याची भावना, मजा, भीती रामु निर्माण करतो.
सेंट मारणारा वकील म्हणजे त्यांचे नावपण वकील "शब्बो कैसी लगी" जेव्हा म्हणतो तेव्हा झरकन मुंबई चा ग्रैटरोड डोळ्यासमोर येतो.
टकला अंकल जेव्हा त्या बिल्डर ला " हम लोग क्या अलिबाग से आये लगता क्या तेरे को?" म्हणतो तेव्हा त्या बिल्डर च्या चेहऱ्यावर चे भाव आणि मग त्याने वाढवलेली खोकी पाहून वास्तव काय असते ह्याची जाणीव होते.
टपोरी चंदर सत्या ला खोली दाखवतांना देवाचा फोटो दाखवून म्हणतो "मस्त मै रहने का। और देख भगवान भी है। मानता है क्या भगवान को?" सत्या काहीच बोलत नाही. कैमरा खिडकी तून पावसाची रीपरिप दाखवत आकाशात जातो. मागे एक गुढ background music. ही कोणत्याही डॉयलॉग शिवाय बरंच काही सांगून जाण्याची कला फक्त रामुकडेच आहे.
सत्या वकील ला म्हणतो " भाऊ को बोल आप आके मिलो भिक्कू नहीं आएगा" बाजूला भिक्कू, अंकल, चंदर बसलेले..वकील एकच कटाक्ष अंकल कडे टाकतो आणि ठिके म्हणून निघतो तेव्हा background ला जो तबला वाजतो तो आपल्याला पुढच्या घटनांची कल्पना देउन जातो.
आत्ता पर्यंत च्या सिनेमांतील सर्वात अनपेक्षित धक्का सत्या त दाखवला आहे. भाऊ ठाकूर स्वतः निवडणूक जिंकल्यावर आपला हार भिक्कू ला घालतो आणि हसत बोलत मागून गोळी मारतो. आख्खं थिएटर सुन्न होतं, अगदी खुर्च्या सुध्दा. तिथंच अंडरवर्ल्ड आणि राजकारण ह्याची नियत काय असते ते कळतं.
असे फ्रेम बाय फ्रेम खुप प्रसंग आहेत. वक्त सबका आता है। मौका सभी को मिलता है। सारखे खोल संवाद.
सर्वात कहर म्हणजे सिनेमात गाणी लिहिलीत द ग्रेट गुलजार ह्यांनी, संगीत विशाल भारद्वाज चे, गायक दस्तुरखुद्द सुरेश वाडकर. हि तीन नांव आणि अंडरवर्ल्ड चा मसालेदार सिनेमा कदाचित आधी सांगितले तर विश्वास बसणार नाही पण हाच "सत्या" आहे.
सत्याने हिंदी चित्रपट स्रुष्टीला एक नवी नजर दिली. सिनेमा बनविण्याचा वास्तवादी, समांतर पण व्यावसायिक मेन स्ट्रीम द्रुष्टीकोन दिला. त्या नंतर ह्या वीस वर्षांत अनेक सिनेमे आले गेले पण सत्या कायम मनात घर करून राहिला. आता तर समांतर सामाजिक वास्तवादी सिनेमा हाच मेन स्ट्रीम सिनेमा म्हणून गणला जातो.
सत्या नव्वदीच्या दशकातील त्या टिपिकल रोमँटिक स्वप्नातल्या सिनेमांना छेद देत जमिनीवर घट्ट रोवलेला मैलाचा दगड ठरला.
धन्यवाद RGV रामु तू आम्हाला तो आनंद दिलास.
--- मिलिंद सहस्त्रबुद्धे

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि