Skip to main content

Posts

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरांचा जाणता राजा
Recent posts

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर

ब्लॅक अँड व्हाईट

  "ब्लॅक अँड व्हाईट" ८० च्या दशकात भारतात जेव्हा टेलिव्हिजन आले तेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. तरी त्यांचं काय ते कौतुक होतं. तुम्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट बघत असलात तरी बघण्याची दृष्टी मात्र रंगीत होती. बातम्या देणारे निवेदक किंवा निवेदिका यांच्या कपड्यांचा रंग जरी दिसताना काळा पांढरा दिसत असला तरी बघणारे प्रेक्षकांच्या मनात मात्र ज्याचा त्याचा रंग असायचा. कोणाला तो लाल-पिवळा, जांभळा-निळा तर काळा दिसायचा. छायागीत बघताना वहिदाच्या मागे धावणारा देवानंद. त्याच्या हातभर शर्टावरचे चेक्स काळे पांढरे दिसले तरी देवानंद चाहत्यांना मात्र त्यात केशरी हिरवा तांबडा रंग दिसत होता. तर वहिदाच्या साडीवरची फुलं नारंगी आणि गुलबकक्षी रंगाची दिसायची. सांगण्याचे तात्पर्य असे की टीव्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट होते तरी बघणारे आपापल्या परीने त्यात रंग भरत होते आणि आनंद घेत होते. अशाच एका ब्लॅक टीव्हीचा २१व्या शतकात बघण्याचा योग परवा मुंबईमध्ये बीकेसीच्या मैदानावर पुन्हा आला. माननीय पंतप्रधान मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मंचावर एकत्र बसले होते. "एक पांढरी दाढी आणि एक काळी दाढी

शुभमंगल

  "शुभमंगल" "शुभ मन गिल" "शुभ मन गिल" "शुभ मन गिल" हे असं कच्चा पापड-पक्का पापड सारखं भराभरा म्हंटलं तर शुभमंगल, शुभमंगल म्हणल्यासारखंच वाटतं हो ना! भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सध्या शुभमंगलमय गोष्टी घडत आहेत. आपण सध्या लागोपाठ सामने जिंकतोय. मागच्या काही आठवड्यात विविध सामन्यांमध्ये शुभमन गिल ह्यानी तर कमालच केली आहे. आधी श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वन डे मध्ये शतकी धावांची खेळी. लगेचच न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वन डे मध्ये द्विशतकी धावांची खेळी. त्याची शंभरी ची भूक संपतच नाही. पुन्हा एकदा न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या वन डेमध्ये शतकी धावांची खेळी. काय म्हणावं ह्या मुलाला. तो कधी थोडा थोडा अर्जुन तेंडुलकर सारखा दिसतो. न्युझीलँड विरुद्ध 2019 मध्ये Hamilton येथे पदार्पण केलेल्या शुभमननी गेल्या चार वर्षात स्वतःच्या दमदार खेळाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. आयपीएल, कसोटी किंवा मग वन डे असेल. क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्ममध्ये त्याचा दमदार फॉर्म तो दाखवतो आहे. त्याच्या ह्या कामगिरीकडे पाहून आता तर त्याला पुढील टि ट्वेंटी टीम मध्ये सुद्धा घेण्यात आले आहे. तस

हिमालयाची सावली

  हिमालयाची सावली आपण आतल्या खोलीत असतो आणि बाहेर TV वर एखादी मालिका किंवा सिनेमा चालू असतो. त्यातील काही संवाद आपल्याला आत ऐकू येतात. आपण आतूनच "अगं, विक्रम गोखले ना? बघ बरोबर ओळखलं की नाही!" अभिनया बरोबर आपल्या आवाजाचीही कडक ओळख असणाऱ्या मोजक्या अभिनेत्यां पैकी एक आवाज आज कायमचा हरपला. पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई आणि वडील चंद्रकांत गोखले अशी अभिनयाची हिमाच्छादीत शिखरे. ह्या सर्वांना सलाम करणारं ह्याच कुळातले अभिनय क्षेत्रातील हिमशिखर म्हणजे विक्रम गोखले. बॅरिस्टर नाटकामधील गाउन घातलेला, तोंडात सिगारेटचा पाइप आणि हातात पुस्तक घेऊन करारी खरज्यात संवाद म्हणत त्याचा तो विशिष्ठ पौज घेणारा वकील म्हणजे विक्रम गोखले. अमिताभ बच्चन समोर अग्निपथ मधील कमिशनर गायतोंडे आणि खुदागवाहमध्ये जेलर रणवीरसिंगच्या भूमिकेत तेवढ्याच ताकदीने अभिनय साकारणारा अधिकारी.. सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमात विघ्न आणणारा हम दिल दे चुके सनम मधील अस्खलित शास्त्रीय गायक पंडित दरबार म्हणजे विक्रम गोखले. लग्न संस्थेची मर्यादा ओलांडून ही आपला वाटणारा, कळत नकळत मधील मनोहर देसाई निवडणुकीच्या राजकारणात उभी-आडवी,

गुंतवणूक

  गुंतवणूक सध्याच्या घडीला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे गुंतवणूक. सीन वन... आमच्या सोसायटीतील शेजारच्या C विंगमधील साठे आजोबा रिटायर होऊन साधारण १२-१५ वर्ष झाली असतील. मोठ्या सहकारी क्षेत्रातील खात्यात बऱ्यापैकी मोठ्या पदावर होते. चांगले पेन्शन पदरात पाडून रिटायर झाले. दर महिन्याला पेन्शन बँकेत जमा होतं आणि मग साधारण पाच-सहा महिन्यांनी चांगली रक्कम अकाउंट वर जमा झाली की सुरू होते चलबिचल. आजोबांचं हे असं गुंतवणुकीचं विचार चक्र वर्षातून किमान दोनदा तीनदा तरी होतंच. एकाच बँकेत सगळे पैसे नकोत. म्हणून मग पेन्शनची सरकारी, व्याजदर काहीश्याच टक्क्यांनी जास्त म्हणून एक सहकारी. तर दैनंदिन व्यवहार Ease of Banking सोप्पे जावेत म्हणून एक प्रायव्हेट, अश्या किमान तीन बँका. एकाच खात्यावर नकोत, म्हणून पेन्शन व्यतिरिक्त एक सेव्हींग खातं. ही एवढी सगळी खाती संभाळता सांभाळता मन वेगळ्याच विचारांनी खातं ते वेगळंच. बँकेत काय सध्या व्याज मिळतंय? मग शेजारी राहणारा राहुल त्यांना सांगतो की आजोबा तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करा. कट्ट्यावरचे देशपांडे सारखे म्हणतात की सोन्यात गुंतवणूक च